Home /News /national /

...तर येत्या काही वर्षात कोट्यवधी भारतीयांचा उष्णतेमुळे होणार मृत्यू, तज्ज्ञांनी दिला इशारा

...तर येत्या काही वर्षात कोट्यवधी भारतीयांचा उष्णतेमुळे होणार मृत्यू, तज्ज्ञांनी दिला इशारा

कोरोनापेक्षा मोठा धोका, येत्या काही वर्षात या कारणामुळं कोट्यवधी लोकांचा जीव धोक्यात येणार आहे.

    नवी दिल्ली, 07 मे : सध्या संपूर्ण देश कोरोनाशी दोनहात करत आहे. भारतातही परिस्थिती बिकट झाली आहे. मात्र येत्या काही वर्षात भारतासमोर नवीन संकट उभं असणार आहे. येत्या 50 वर्षात जवळजवळ 120 कोटी लोकांना भयंकर उष्णतेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. हा उन्हाळा अगदी सहारा वाळवंटात असणाऱ्या तापमानाप्रमाणे असेल. पडण्यासारखा असेल. अशी परिस्थिती येण्यामागचे कारण म्हणजे जागतिक तापमानात होणारी वाढ. प्रदूषण, झाडे तोडणे आणि ग्लोबल वार्मिंग यामुळे उष्णता वाढणार आहे. भारत, नायजेरिया आणि पाकिस्तानसह 10 देशांमध्ये उष्णता वाढणार आहे. ब्रिटनच्या एक्झीटर युनिव्हर्सिटीचे संशोधक टिम लेंटन यांनी याबाबत रिसर्च केला आहे. टिम लेंटन म्हणाले की, हे आकडे पाहून मी स्तब्ध झालो आहे. मी बर्‍याचदा तपासले पण हे आकडे खरे आहेत. मानवाला ग्लोबल वार्मिंगचा सर्वात मोठा धोका आहे. गार्डियन या वृत्तसंस्थेने ही बातमी प्रसिद्ध केली. वाचा-तृतीयपंथीयांनी दिला मदतीचा हात, सोनं तारण ठेवून 1000 कुटुंबीयांना दिलं धान्य नॅशनल अकादमी ऑफ सायन्सेसमध्ये प्रकाशित टिम लेंटनच्या रिपोर्टनुसार, अजूनही लोकं अशा ठिकाणी रहायला प्राधान्य देतात जेथे सरासरी किमान तापमान 6 अंश आणि सरासरी कमाल तापमान 28 डिग्री सेल्सिअसपर्यंत असेल. हे तापमान वाढले अथवा कमी झाल्यास, त्याचा परिणाम मानवी शरीरावर होते. सध्या जगातील बर्‍याच देशांमध्ये जमीन समुद्रापेक्षा वेगाने तापत आहे. म्हणजेच, या शतकाच्या अखेरीस, सरासरी जागतिक तापमानात 3 अंश सेल्सिअस वाढ होईल. त्यावेळी मानवाला वेगवेगळ्या देशांच्या आणि तेथील हवामानानुसार 7.5 डिग्री जास्त तापमानास तोंड द्यावे लागेल. वाचा-हा VIDEO पाहून आता काय म्हणाल? दारू दुकानाबाहेर घुंगट घेतलेल्या महिलांची रांग याचा अर्थ भारतात जर उन्हाळ्यात तापमान 48 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढले तर या शतकाच्या अखेरीस हे तापमान 55 किंवा 56 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढू शकते. मात्र येते सरासरी तापमानाबद्दल बोलले जात आहे. यानुसार, जगातील 30 टक्के लोकांना अत्यंत उच्च तापमानात रहावे लागणार आहे. सहारासारख्या वाळवंटी प्रदेशात 55 किंवा 56 डिग्री तापमान असते. अशा वातावरणात राहणं शक्य नसते. या शतकाच्या अखेरीस, जेव्हा पृथ्वीचे सरासरी तापमान 3 डिग्री सेल्सिअसने वाढेल, तेव्हा भारत, नायजेरिया, पाकिस्तानसह अनेक देशांच्या नागरिकांना उष्णतेमुळे त्रास होईल. वाचा-VIDEO : मास्कच्या कारखान्यातच मास्क न घालता फिरले डोनाल्ड ट्रम्प आणि... टिम लेंटन यांनी सांगितले की, भारतातील सुमारे 120 कोटी लोकांना सहारा वाळवंटासारख्या गर्मीत रहावे लागेल. तर, नायजेरियातील 48.5 कोटी, पाकिस्तानमधील 18.5 कोटी, इंडोनेशियातील 14.6 कोटी, सुदान 10.3 कोटी, नायजर 10 कोटी, फिलीपिन्समध्ये 9 कोटी, बांगलादेश 9.80 कोटी, बुर्किना फासोमध्ये 6.40 कोटी आणि थायलंड 6.20 कोटी, इतक्या लोकांना उच्च तापमानाचा सामना करावा लागणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या