मराठी बातम्या /बातम्या /देश /काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचा नवा प्लान, टेस्ट घेऊन करताहेत तरुणांची भरती

काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचा नवा प्लान, टेस्ट घेऊन करताहेत तरुणांची भरती

एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. काश्मीरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी (Security Forces) दहशतवादी संघटनांचे (Terrorist Organizations)कंबरडे मोडलं आहे.

एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. काश्मीरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी (Security Forces) दहशतवादी संघटनांचे (Terrorist Organizations)कंबरडे मोडलं आहे.

एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. काश्मीरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी (Security Forces) दहशतवादी संघटनांचे (Terrorist Organizations)कंबरडे मोडलं आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: एक चिंताजनक बातमी समोर येत आहे. काश्मीरमध्ये लष्कर आणि सुरक्षा दलांनी (Security Forces) दहशतवादी संघटनांचे (Terrorist Organizations)कंबरडे मोडलं आहे. सुरक्षा दल आणि लष्कराकडून करण्यात येत असलेल्या तात्काळ कारवाईत दहशतवादी ठार होत आहेत. अशातच हिवाळा आता तोंडावर आला आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय चिंतेत आहे की काश्मीरमध्ये अशी स्थिती असताना उर्वरित दोन महिन्यांत खोऱ्यामध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना घुसखोरी किंवा शस्त्रे पुरवण्यात आली नाहीत तर काय होईल? अशा परिस्थितीत आयएसआयनं विश्वासार्ह दहशतवाद्यांची टीम बनवण्याची नवी रणनीती आखली आहे.

गुप्तचर रिपोर्टनुसार, या रणनीतीअंतर्गत काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यापूर्वी तरुणांना दहशतवादी कारवाया करण्यास प्रवृत्त करण्याची योजना आहे. खोऱ्यात दगडफेकीच्या वेळी दहशतवादी तरुणांच्या हातात जसं दगड देत होते आता त्यात बदल करुन दगडांऐवजी हातबॉम्ब देण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा- 'T20 वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्व काही करणार', रोहित शर्मानं दिला गंभीर इशारा! 

अतिशय धोकादायक योजना

यासाठी एके 47 ऐवजी पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि ग्रेनेड सारखे पहिले छोटे शस्त्रे नवीन भरती झालेल्यांच्या हातात देण्याची तयारी केली जात आहे. याद्वारे, ISI आणि दहशतवाद्यांचे दोन अर्थ एकाच वेळी पूर्ण होऊ शकतात.

दरम्यान काही काळापासून असं दिसून येत आहे की, सुरक्षा दल आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येनं आवाहन केल्यानंतर काही तरुण दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परतत आहेत. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. त्यामागचं कारण एक म्हणजे दहशतवाद्यांची शरणागती, घरवापसी आणि त्यांच्यासह शस्त्रास्त्रेचं देखील आत्मसमर्पण करणे. त्यामुळे आता दहशतवाद्यांच्या हातात दगडांऐवजी ग्रेनेड देऊन त्यांच्या मायदेशी परतण्याचा मार्गही बंद करण्यात यावा अशी इच्छा आहे.

हेही वाचा- ममता बॅनर्जींच्या भवितव्याचा आज निर्णय, मुख्यमंत्रीपद कायम राहणार की जाणार?

शस्त्र पुरवण्याचा प्रयत्न

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच शस्त्रांचा एक माल अनंतनाग आणि अनेक ठिकाणी पाठवण्यात आला आहे. ज्यामध्ये 20 ग्रेनेड आणि 4 ते 5 पिस्तूल समोर आले आहेत. असंच उरीमध्ये लष्करानं लहान शस्त्रे आणि ग्रेनेड जप्त केली आहे. 80 हँड ग्रेनेड आणि 7 पिस्तूल आणि एक रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आलेत.

First published:

Tags: Jammu and kashmir, Terrorist, Terrorist attack, Terrorists