मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal By polls: भवानीपूर जागेवर आज पोटनिवडणूक, ममता बॅनर्जी यांच्या भवितव्याचा निर्णय; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

West Bengal By polls: भवानीपूर जागेवर आज पोटनिवडणूक, ममता बॅनर्जी यांच्या भवितव्याचा निर्णय; कडक सुरक्षा व्यवस्था तैनात

West Bengal By polls:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

West Bengal By polls:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

West Bengal By polls:पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे.

कोलकाता, 30 सप्टेंबर: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( mamata banerjee ) यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. पश्चिम बंगालच्या (West Bengal) भवानीपूर विधानसभा (Bhabanipur Assembly Election)पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भागात कडक सुरक्षा (Security) व्यवस्था करण्यात आली असून केंद्रीय दलाच्या 15 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.

पश्चिम बंगालमधील भवानीपूर, जंगीपूर आणि शमशेरगंज या विधानसभेच्या तीन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघातून टीएमसीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी यांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये पेटीत कैद होईल. या जागेवर भाजपच्या प्रियांका टिबरेवाल आणि माकपचे श्रीजीव विश्वास हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, ज्या मतदान केंद्रांवर आज मतदान होणार आहे, तिथे सीआरपीसीच्या कलम 144 अंतर्गत मतदान केंद्रांच्या 200 मीटरच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कुठल्याही मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसराच्या आत पाचहून अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई आहे. शस्त्रे, स्फोटकं, दगडं आणि फटाके आणण्यास बंदी घालण्यात आली आहे, असं कोलकाता पोलिसांनी आदेशात म्हटलं आहे.

भवानीपूरमधील 97 मतदान केंद्रांवरील प्रत्येक 287 मतदान केंद्रांवर केंद्रीय दलाचे जवान तैनात करण्यात आलेत. त्यानंतर मतदान केंद्रांच्या बाहेरची सुरक्षा ही कोलकाता पोलिसांच्या हातात असेल, अशी माहितीही अधिकाऱ्यानं दिली आहे.

अधिकाऱ्यानं सांगितलं की, भवानीपूरमध्ये 38 ठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. भवानीपूर पोटनिवडणुकीसाठी एक अतिरिक्त पोलीस आयुक्त, चार सहआयुक्त, 14 उपायुक्त आणि अनेक सहाय्यक आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली असल्याचीही माहिती अधिकाऱ्यानं दिली आहे.

हेही वाचा- ''कामचुकारपणा केल्याचं निदर्शनास आलं तर...'', मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा

आम्ही तीन अतिरिक्त नियंत्रण कक्ष देखील उघडले आहेत. ईव्हीएमची वाहतूक करण्यासाठी 141 विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यानं पुढे म्हटलं की, शहरात अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे सर्व पोलिसांना रेनकोट घालण्यास आणि छत्री सोबत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा- क्या बात है! IT कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते आठवड्यातून 3 दिवस सुटी; 4 दिवसच करावं लागणार काम

याव्यतिरिक्त निवडणूक आयोगाने पाटबंधारे विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून सर्व मतदान केंद्रांवर पावसाचे पाणी साचल्यास ते तात्काळ काढण्यासाठी पंप तयार ठेवण्यास सांगितलं आहे. अधिकाऱ्यानं सांगितलं की, पावसामुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी पाटबंधारे विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एका निवडणूक अधिकाऱ्याने सांगितलं की, जंगीपूर आणि शमशेरगंजमध्येही कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या जागांवर गुरुवारी विधानसभा निवडणुकाही होणार आहेत. 3 ऑक्टोबर रोजी मतमोजणी केली जाईल.

First published:

Tags: Mamta Banerjee, West Bengal Election