मराठी बातम्या /बातम्या /देश /उद्यापासून 'या' राज्यात अबकारी धोरणात बदल, खासगी दारुची दुकानं 45 दिवसांसाठी बंद

उद्यापासून 'या' राज्यात अबकारी धोरणात बदल, खासगी दारुची दुकानं 45 दिवसांसाठी बंद

एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ( New Delhi) नवीन अबकारी धोरणाची (new excise policy) अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ( New Delhi) नवीन अबकारी धोरणाची (new excise policy) अंमलबजावणी करण्यात आली आहे.

एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ( New Delhi) नवीन अबकारी धोरणाची (new excise policy) अंमलबजावणी करण्यात आली आहे.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर: एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत ( New Delhi) नवीन अबकारी धोरणाची (new excise policy) अंमलबजावणी करण्यात आली आहे. या नव्या धोरणानुसार उद्यापासून (closed from tomorrow) म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून सर्व खासगी दारूची (all private liquor shops) दुकाने बंद राहतील. दिल्ली सरकारच्या नवीन अबकारी धोरणानुसार, 266 खासगी दारू दुकानांसह सर्व 850 दारू दुकाने निविदांद्वारे खासगी कंपन्यांना देण्यात आली आहेत. 45 दिवस ही दुकानं बंद राहतील. हे दिल्लीतील एकूण दारूच्या दुकानांपैकी सुमारे 40 टक्के आहेत.

नवीन परवानाधारक 17 नोव्हेंबरपासून दारूची किरकोळ विक्री सुरू करतील. या काळात सरकारी दुकाने खुली असतील. जी 16 नोव्हेंबरनंतर बंद होतील. पण दारूचा तीव्र तुटवडा असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा- लीलावती रुग्णालयाच्या ट्रस्टीचे 45 कोटींचे सोनं चोरीला, हायकोर्टात याचिका दाखल

काय आहे नवं धोरण

नवीन धोरण ग्राहकांच्या अनुभवामध्ये सुधारणा करणे, दारू माफियांना आळा घालणं आणि पायरसी दूर करणं आणि राष्ट्रीय राजधानीत दारू व्यवसाय सुधारणे हे आहे. नवीन अबकारी धोरणाअंतर्गत, दिल्ली सरकारला दारूची दुकानं 32 झोनमध्ये विभागून संपूर्ण शहरात न्याय्य वितरण सुनिश्चित करायचे आहे.

नवीन धोरणानुसार, एका झोनमध्ये 8-10 वार्डांचा समावेश करण्यात आला आहे आणि प्रत्येक झोनमध्ये सुमारे 27 दारूची दुकाने असतील. सध्या काही वॉर्डांमध्ये 10 पेक्षा जास्त दारूची दुकाने आहेत. तर काही वॉर्डांमध्ये दुकाने नाहीत.

हेही वाचा- टीम इंडियातील वादावर BCCI ची पहिली प्रतिक्रिया, विराट कोहलीवर दिलं 'हे' स्पष्टीकरण 

नवीन अबकारी धोरणानुसार, दिल्ली सरकारला दारूच्या दुकानांच्या लिलावातून सुमारे 10 हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. दिल्ली सरकारनं म्हटलं आहे की, दारू विक्री किंवा त्याची सेवा देण्याचे वय शेजारील राज्यांच्या वयाशी अनुरूप असावं, जेथे कायदेशीर मद्यपान वय आधीच 21 वर्षे आहे. दारुच्या दुकानांमध्ये एअर कंडिशनरसोबत चांगली लाईट्सची व्यवस्था आणि काचेचे दरवाजे ठेवणे. दुकानाच्या बाहेर आणि आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील आणि एक महिन्याचे रेकॉर्डिंग ठेवावे लागेल.

First published:

Tags: Delhi News, Illegal liquor, Liquor stock