Home /News /national /

लीलावती रुग्णालयाच्या ट्रस्टीचे 45 कोटी रुपयांचं सोनं, हिरे चोरीला; गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल

लीलावती रुग्णालयाच्या ट्रस्टीचे 45 कोटी रुपयांचं सोनं, हिरे चोरीला; गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल

गुजरात उच्च न्यायालयात तब्बल 45 कोटी (Rs 45 crore ) रुपयांच्या चोरीप्रकरणी खटला दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे.

    गुजरात, 30 सप्टेंबर: गुजरात उच्च न्यायालयात तब्बल 45 कोटी (Rs 45 crore ) रुपयांच्या चोरीप्रकरणी खटला दाखल करण्यात आल्याची घटना घडली आहे. 45 कोटी रुपयांच्या मौल्यवान वस्तूंची कथित चोरी झाल्याची तक्रार गुजरात उच्च न्यायालयात (Gujarat High Court) दाखल झाली आहे. या तक्रारीनंतर पालनपूरमधील पोलीस या प्रकरणाची नोंद करण्यात अपयशी ठरलेत. मुंबईतील लीलावती हॉस्पिटलच्या ट्रस्टीच्या मुलांपैकी एक प्रशांत किशोर मेहता (Prashant Kishor Mehta) यांनी ही याचिका दाखल केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? समोर आलेल्या माहितीनुसार, मेहता यांच्या आजोबांनी खूप वर्षांपूर्वी बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूरमध्ये गरिबांसाठी मणी भूवन हे धर्मादाय रुग्णालय बांधलं होतं. या रुग्णालयाच्या इमारतीत एक सुरक्षित तिजोरी होती ज्यात मेहताच्या आजोबांनी कोट्यवधी रुपयांची मौल्यवान वस्तू ठेवली होती. हेही वाचा- IPL 2021, RCB vs RR : गोळीपेक्षा तेज कोहली! राजस्थान विरुद्ध केली अफलातून फिल्डिंग, VIDEO त्यावर याचिकादारानं आरोप केला की, इमारतीच्या केअरटेकर्सनी सुरक्षित असलेली तिजोरी फोडली आणि 2019 मध्ये इमारतीचं नूतनीकरण होत असताना 45 कोटी रुपयांचे साहित्य चोरी केलं. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून लीलावती रुग्णालयालाही भेट दिली. मात्र काही कारणास्तव, चौकशी कथितपणे बंद करण्यात आली. हेही वाचा- भयानक!  काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांचा नवा प्लान, ऐकून तुम्हालाही बसेल धक्का  काय-काय साहित्य गेलं चोरीला चोरी झालेल्या वस्तूंमध्ये 3.5 किलो सोनं, 8.5 कॅरेट हिरे, रत्ने, सोन्या -चांदीचे दागिने आणि बडोद्याच्या राजघराण्यातील प्राचीन भांडी यांचा समावेश होता. मेहता यांच्या तक्रारीमध्ये रश्मी मेहता, चेतन मेहता, भाविन मेहता, दिलीप संघवी आणि लक्ष्मी नारायण यांचा आरोपी म्हणून उल्लेख करण्यात आला आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gujrat, High Court

    पुढील बातम्या