मराठी बातम्या /बातम्या /देश /परदेशी प्रवाशांना भारतात RT-PCR टेस्ट बंधनकारक, एक लस घेतलेल्यांना 7 दिवस विलगीकरण, वाचा सविस्तर

परदेशी प्रवाशांना भारतात RT-PCR टेस्ट बंधनकारक, एक लस घेतलेल्यांना 7 दिवस विलगीकरण, वाचा सविस्तर

 परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी (New entry rules for international travelers by Indian government) नवी नियमावली जाहीर केली आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी (New entry rules for international travelers by Indian government) नवी नियमावली जाहीर केली आहे.

परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी (New entry rules for international travelers by Indian government) नवी नियमावली जाहीर केली आहे.

नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर: परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी (New entry rules for international travelers by Indian government) नवी नियमावली जाहीर केली आहे. परदेशातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना 72 तासांपूर्वी (RT-PCR test mandatory) केलेल्या RT-PCR टेस्टचा रिपोर्ट दाखवावा लागेल. हा रिपोर्ट निगेटिव्ह असेल, तर भारतात प्रवेश देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणं प्रवाशांना एक सेल्फ-डिक्लेरेशन (Self-declaration form necessary) फॉर्म भरावा लागणार असून त्यासोबत RT-PCR टेस्टचे तपशील भरणं बंधनकारक असणार आहे.

लसीकरण सर्टिफिकेट गरजेचं

ज्या देशांनी भारतातील लसीकरण सर्ट़िफिकेटला मान्यता दिली आहे, त्या देशांच्या लसीकऱण सर्टिफिकेटला मान्यता देण्यात आली आहे. पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांना आणि WHO किंवा भारतानं मान्यता दिलेल्या लसी घेतलेल्या नागरिकांना क्वारंटाईनची अट असणार नाही. अशा नागरिकांनी 14 दिवस ‘सेल्फ मॉनिटरिंग’ करावं, अशा सूचना देशाच्या आरोग्य मंत्रालयानं दिल्या आहेत. मात्र ज्यांनी लसीचा एकच डोस घेतला आहे किंवा भारतात मान्यता नसलेल्या लसीचा डोस घेतला आहे, अशा नागरिकांना अगोदर 7 दिवस होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे. त्यानंतर पुन्हा एकदा टेस्ट करून ती निगेटिव्ह आल्यास देशात प्रवेश दिला जाणार आहे.

टेस्ट असेल तर विमानात प्रवेश

प्रवाशांनी सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म भरला असेल आणि RT-PCR टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट असेल, तरच विमानात प्रवेश देण्यात यावा, अशा सूचना भारत सरकारनं सर्व विमान कंपन्यांना दिले आहेत.

हे वाचा- क्रूर! चांदीचे कडे आणि पैंजण चोरण्यासाठी तोडले पाय, गळा कापून केला खून

ब्रिटनने दिली मान्यता

गेल्या महिन्यात भारतातील लसीकरण सर्टिफिकेटला मान्यता देण्यावरून ब्रिटीश सरकारसोबत भारत सरकारचा संघर्ष झाल्याचं चित्र होतं. मात्र त्यानंतर ब्रिटन सरकारनं भारतातील कोव्हिशिल्डला मान्यता देत एक पाऊल मागे घेतलं होतं. कोव्हिशिल्ड किंवा ब्रिटननं मान्यता दिलेली कुठलीही लस घेतल्यास क्वारंटाईनची अट काढून टाकली होती. त्यानंतर भारतानंदेखील ब्रिटीश नागरिकांसाठीची क्वारंटाईनची अट मागे घेतली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Delhi, Vaccination