मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

क्रूर! चांदीचे कडे आणि पैंजण चोरण्यासाठी तोडले पाय, गळा कापून केला खून

क्रूर! चांदीचे कडे आणि पैंजण चोरण्यासाठी तोडले पाय, गळा कापून केला खून

महिलेच्या पायात असलेलं पैंजण आणि हातातील दोन चांदीचे कडे मिळवण्यासाठी गुंडांनी (Thieves murders woman to  steal her jewelry) महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

  • Published by:  desk news
जयपूर, 20 ऑक्टोबर :  महिलेच्या पायात असलेलं पैंजण आणि हातातील दोन चांदीचे कडे मिळवण्यासाठी गुंडांनी (Thieves murders woman to  steal her jewelry) महिलेची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अगोदर या गुंडांनी (slit throat for theft) महिलेचे पाय तोडले आणि तिच्या पायातील पैंजण काढून घेतलं. त्यानंतर तिची (Murderers ran away) गळा कापून हत्या केली आणि तिच्या हातातील सोन्याचे कडे घेऊन चोरटे लंपास झाले. अशी घडली घटना राजस्थानची राजधानी जयपूरहून केवळ 50 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या खतेहपुरा गावात राहत होती. गावातील लोकांच्या घरची गुरं शेतात चरायला नेणं आणि संध्याकाळी ती परत घेऊन येण्याचं काम ही महिला करायची. नेहमीप्रमाणं घटनेच्या दिवशी ही महिला गुरांना शेतात चरण्यासाठी घेऊन गेली होती. त्याचवेळी तिथं आलेल्या दोन चोरट्यांची नजर तिच्या दागिन्यांवर पडली. चोरट्यांनी केला हल्ला एक पैंजण आणि चांदीचे दोन कडे मिळवण्यासाठी चोरट्यांनी थेट महिलेवर हल्ला करत तिचे पाय तोडले. पाय तोडून तिचं पैंजण काढून घेतलं. त्यानंतर महिलेनं आपल्याला ओळखू नये, या भीतीने गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली. त्यानंतर हातातील दोन कडेही चोरट्यांनी काढून घेतले आणि घटनास्थळावरून पोबारा केला. हे वाचा- 15 दिवसात 15 दहशतवाद्यांचा खात्मा, शोपियानमध्ये एका जवानास वीरमरण ग्रामस्थ झाले आक्रमक या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी महिलेचा मृतदेह घेऊन पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केलं आहे. गावात चरिचार्थासाठी आणि शेतीच्या कामासाठी अनेक महिला फिरत असतात. या घटनेमुळे महिलांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी ताबडतोब खुन्यांना पकडावे आणि महिलेच्या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. महिलेच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि 25 लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
First published:

Tags: Crime, Murder, Rajstan

पुढील बातम्या