मराठी बातम्या /बातम्या /देश /साडेसहा वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात झाडली गोळी, मरणानंतर 5 जणांना दिलं जीवदान

साडेसहा वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात झाडली गोळी, मरणानंतर 5 जणांना दिलं जीवदान

एका साडे सहा वर्षांच्या चिमुकलीनं 5 लोकांना नवं आयुष्य दिलं आहे. हो हे खरंय..सर्वांत कमी वयात एक चिमुकली ऑर्गन डोनर बनली आहे.

एका साडे सहा वर्षांच्या चिमुकलीनं 5 लोकांना नवं आयुष्य दिलं आहे. हो हे खरंय..सर्वांत कमी वयात एक चिमुकली ऑर्गन डोनर बनली आहे.

एका साडे सहा वर्षांच्या चिमुकलीनं 5 लोकांना नवं आयुष्य दिलं आहे. हो हे खरंय..सर्वांत कमी वयात एक चिमुकली ऑर्गन डोनर बनली आहे.

नवी दिल्ली, 19 मे: एका साडे सहा वर्षांच्या चिमुकलीनं 5 लोकांना नवं आयुष्य दिलं आहे. हो हे खरंय..सर्वांत कमी वयात एक चिमुकली ऑर्गन डोनर बनली आहे. ही घटना नोएडातली (Noida) आहे.

काय आहे नेमकी घटना

एका साडे सहा वर्षांच्या चिमुकलीची निर्दयीपणे गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मात्र त्यानंतर आयुष्य संपल्यानंतर या चिमुकलीनं 5 जणांना नवजीवन दिलं आहे. हे प्रकरण नोएडाचे आहे. साडे सहा वर्षांच्या रोलीच्या डोक्यात गोळी मारली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. पण ती कोमात गेली. त्यानंतर तिला एम्समध्ये नेण्यात आले. मात्र तेथेही डॉक्टरांनी रोलीला ब्रेन डेड घोषित केलं. AIIMS च्या इतिहासात ऑर्गन डोनेट (Youngest Organ Donor) करणारी रोली ही सर्वात कमी वयातली डोनर बनली आहे.

एजन्सीनुसार एम्सचे वरिष्ठ न्यूरोसर्जन डॉ. दीपक गुप्ता यांनी सांगितले की, साडेसहा वर्षांची मुलगी रोली 27 एप्रिल रोजी रुग्णालयात पोहोचली. तिला गोळी लागली आणि ती गोळी तिच्या मेंदूत अडकली. मेंदू पूर्णपणे खराब झाला होता. जवळजवळ ब्रेन डेड अवस्थेत ती हॉस्पिटलमध्ये पोहोचली. आम्ही कुटुंबीयांशी बोललो.

Raj Kundra  अडचणीत, पुन्हा होणार अटक?; ED कडून गुन्हा दाखल 

न्यूरोसर्जननं सांगितलं की, आमची टीम मुलीच्या पालकांसोबत बसून अवयवदानाबद्दल बोलली. आम्ही पालकांचे समुपदेशन केले आणि इतर मुलांचे प्राण वाचवण्यासाठी ते रोलीचे अवयव दान करण्यास तयार आहेत की नाही याबद्दल त्यांची संमती मागितली. रोली प्रजापतीच्या पालकांनी आपल्या मुलीचे अवयव दान केले.

डॉ.गुप्ता म्हणाले की, अवयवदानाविषयी फारशी माहिती नसतानाही हे पाऊल उचलल्याबद्दल आम्ही पालकांचे आभारी आहोत, कारण त्यांना जीव वाचवण्याचे महत्त्व समजले. रोलीने 5 जणांचे प्राण वाचवले आहेत.

आपल्या मुलीचे अवयव दान केल्यानंतर, रोलीचे वडील हरनारायण प्रजापती म्हणाले की, डॉ. गुप्ता आणि त्यांच्या टीमने आम्हाला अवयवदानाचा सल्ला दिला की आमचे मूल इतर लोकांचे प्राण वाचवू शकते. आम्ही याबद्दल विचार केला आणि ठरवले की ती इतर लोकांच्या शरीरात जगेल आणि त्यांच्या जीवनात हास्य पसरवेल.

पोलीस होण्याचं स्वप्नं भंगलं; प्रॅक्टिस करतानाच स्कूटीवरुन खाली पाडून रोडरोमिओंकडून छेडछाड

रोलीची आई पूनम देवी म्हणाल्या की, तिची मुलगी आता त्यांच्यासोबत नसली तरी तिने इतर लोकांचे प्राण वाचवण्यात यश मिळवले आहे.

First published:

Tags: Delhi, Organ donation