मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पोलीस होण्याचं स्वप्नं भंगलं; प्रॅक्टिस करतानाच स्कूटीवरुन खाली पाडून रोडरोमिओंकडून छेडछाड

पोलीस होण्याचं स्वप्नं भंगलं; प्रॅक्टिस करतानाच स्कूटीवरुन खाली पाडून रोडरोमिओंकडून छेडछाड

बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय.

बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय.

बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय.

बीड, 19 मे: बीडमधून (Beed) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरात उघडकीस आलीय. पोलीस भरतीची प्रॅक्टिस (Practicing Police Recruitment) करणाऱ्या विवाहित महिलेची (Married Woman) गुंड रोडरोमिओंनी छेडछाड (Molested by Goons) काढल्याचा प्रकार समोर आला आहे.

शहरातील 26 वर्षीय विवाहित महिला गेल्या अनेक दिवसांपासून आपलं पोलीस बनण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी, जिवाचे रान करत आहे. गेल्या 5 मे रोजी पहाटे पावणे पाचच्या दरम्यान पोलीस भरती करणाऱ्या आपल्या मित्रासोबत, ती शहरातील चराटा फाटा परिसरातील ग्राउंडवर प्रॅक्टिससाठी गेली होती. यावेळी दोन गुंड प्रवृत्तीच्या रोडरोमिओंनी तिच्यासमोर गाडी आडवी लावून अडवलं. "तुझं स्कार्फ सोड, मला तुझा फोटो काढायचा आहे." असं म्हणत त्या गुंडांनी चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.

पालकांनी वेळीच सावध व्हा; इतक्या कमी वयातच मुलांमध्ये दिसतात कॅन्सर, डायबिटीजची लक्षणं

मात्र आपला जीव वाचवण्यासाठी तिने आपली स्कूटी चालू केली तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र या दरम्यान त्या 2 रोडरोमिओंनी तिचा पाठलाग करत तिला स्कूटीवरून खाली पाडलं. यामुळे तिच्या पूर्ण शरीरावर जखमा झाल्या आहे. पोटाला जवळपास 15 टाके पडले आहेत. तर चेहऱ्यावरही मोठी दुखापत झाल्याने हनुवटीला टाके आहेत. एवढंच नाही तर हात असो वा पाय असो सर्वच, ठिकाणी मोठमोठ्या जखमा झाल्या आहेत. सध्या पीडित विवाहित महिलेवर शहरातील लोट्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये त्या दोन नराधम गुंड रोडरोमिओंविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी याची दखल घेत एका आरोपीला अटक केलीय. तर दुसऱ्या आरोपीचा शोध शिवाजीनगर पोलीस करत आहेत.

Raj Kundra अडचणीत वाढ, पुन्हा होणार अटक?; ED कडून गुन्हा दाखल

माझ्या मुलीचं स्वप्न अधुरं राहिले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पोलीस भरतीमध्ये अवघ्या काही मार्काने ती पोलीस बनू शकली नाही. म्हणून पुन्हा एकदा ती जिद्दीने आपली प्रॅक्टिस करत होती. पहाटे ती प्रॅक्टिस करण्यासाठी ग्राउंडवर गेली आणि ही घटना घडली. मायबाप पोलीस आणि सरकारने या 2 आरोपींना कठोर शासन करत कारवाई करावी. जेणेकरून माझ्या मुलींसारखं इतर मुलींचं स्वप्न अधुरं राहणार नाही आणि त्यांचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही, अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली आहे.

First published:
top videos

    Tags: Beed