मुंबई, 19 मे: अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती (Actress Shilpa Shetty's husband) आणि बिझनेसमन राज कुंद्रा (Businessman Raj Kundra) याच्या पुन्हा एकदा अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने राज कुंद्राविरुद्ध (Raj Kundra) गुन्हा नोंदवला आहे. पॉर्न रॅकेट प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये अटक केली होती. त्यानंतर राज कुंद्रा सध्या जामिनावर बाहेर आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) राज कुंद्राविरुद्ध फेमा (फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ईडीच्या तपासानुसार
फेब्रुवारी 2019 मध्ये, राज कुंद्राने आर्म्स प्राइम मीडिया लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि हॉटशॉट्स नावाचे अॅप विकसित केले. यूकेस्थित कॅनरीन कंपनीचे सीईओ प्रदीप बक्षी हे खरे तर राज कुंद्राचे मेहुणे आहेत. मात्र या हॉटशॉट्स अॅपच्या देखभालीसाठी राज कुंद्राच्या कंपनी विहानने केनरिन कंपनीशी करार केला होता. तसंच या देखभालीसाठी विहान कंपनीच्या 13 बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचे व्यवहार झाले.
हॉटशॉट्स अॅप हे खरं तर पॉर्न फिल्म्ससाठी एक प्लॅटफॉर्म होतं. ज्यामध्ये भारतात पॉर्न फिल्म्स बनवल्या जायच्या आणि हॉटशॉट्स अॅपवर लोड केल्या जायच्या आणि सबस्क्रिप्शन विकल्या जायच्या. सब्सक्राइबरच्या माध्यमातून मिळालेली मोठी रक्कम राज कुंद्राच्या कंपनी विहानमध्ये मेंटेनन्सच्या नावावर केली जात होती आणि अशा प्रकारे यूकेमधून फिरणाऱ्या पॉर्न फिल्म्समधून मिळणारा पैसा मेंटेनन्सच्या नावावर राज कुंद्राच्या कंपनीच्या खात्यात यायचा.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुंद्रा आणि त्यांची कंपनी विहान यांच्याशी संबंधित सर्व बॅक खात्यांमध्ये पॉर्न चित्रपटांमधून कमाईचे उच्च प्रमाणातील व्यवहार प्राप्त झाले आहेत.
तसंच मेंटेनन्सच्या नावाखाली राज कुंद्राच्या विहान कंपनीच्या ब्रिटनमधील केनरीन कंपनीच्या 13 बाईक खात्यांमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाला आणि नंतर ही रक्कम काही विक्री कंपन्यांकडे वर्ग करण्यात आली आणि शेवटी ही रक्कम राज कुंद्राच्या वैयक्तिक खात्यात येत होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj kundra, Shilpa shetty