प्रसूतीनंतर नर्सने सांगितलं मुलगा झाला, आईच्या हातात दिली मुलगी; आता होणार DNA टेस्ट

प्रसूतीनंतर नर्सने सांगितलं मुलगा झाला, आईच्या हातात दिली मुलगी; आता होणार DNA टेस्ट

महिला आणि तिच्या पतीने हॉस्पिटल प्रशासनाकडे याची तक्रार केली मात्र त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नाही.

  • Share this:

अहमदाबाद 18 जुलै: गुजरातमधल्या (Gujarat)  अहमदाबादमध्ये (Ahmedabad) हॉस्पिटलचा आणखी एक हलगर्जीपणा समोर आलाय. प्रसूतीनंतर नर्सने त्या महिलेने तुम्हाला मुलगा झाला असं सांगितलं. आणि नंतर डॉक्टरने आईच्या हातात मुलगी सोपवली. त्यानंतर एकच गोंधळ झाला. आता त्या मुलीची DNA टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातल्या सोला सिव्हिल हॉस्पिटलमधला (Sola civil hospital) हा प्रकार आहे.

प्रसूतीसाठी या महिलेला गुरुवारी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. सिझेरियन करण्यात आलं. नंतर नर्सने तिला तुम्हाला मुलगा झाल्याचं सांगितलं. काही वेळाने मात्र आईच्या हातात मुलगी दिल्याने त्यांना धक्का बसला. त्या महिला आणि तिच्या पतीने हॉस्पिटल प्रशासनाकडे याची तक्रार केली मात्र त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलं नाही.

त्यामुळे त्या दोघांनीही आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे. बाळांची अदलाबदल झाली नाही असं हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं आहे. त्या महिलेले कोव्हिड वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं होतं. तिथे इतर कुठलीही प्रसूती झाली नाही. त्यामुळे बाळाची अदलाबदल होण्याचा प्रश्नच नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चिंताजनक! कोरोनाबाधित मुलांमध्ये आता दिसत आहेत आणखी एका गंभीर आजाराची लक्षणे

मुलगा झाल्याचं सांगणं ही नर्सची चूक होती. ही मानवी चूक होती असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे. शेवटी त्या मुलीची DNA टेस्ट करण्याचा निर्णय करण्यात आल्याचं हॉस्पिटलने म्हटलं आहे.

रागावलेल्या सुनेला सासुने घेतले कडेवर, व्हायरल VIDEO मुळे नेटिझन्स आश्चर्यचकित

हॉस्पिटलमधलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णयही पोलिसांनी घेतला आहे.  त्याचबरोबर त्या नर्सची चौशीही करण्यात येणार आहे. मात्र अहमदाबादमधल्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणाच्या या आधीही घटना घडल्याने त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: July 18, 2020, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading