जाहिरात
मराठी बातम्या / Viral / नवऱ्यावर रागावलेल्या सुनेला सासुने घेतले कडेवर, व्हायरल VIDEO बाबत नेटिझन्सनी व्यक्त केलं आश्चर्य

नवऱ्यावर रागावलेल्या सुनेला सासुने घेतले कडेवर, व्हायरल VIDEO बाबत नेटिझन्सनी व्यक्त केलं आश्चर्य

नवऱ्यावर रागावलेल्या सुनेला सासुने घेतले कडेवर, व्हायरल VIDEO बाबत नेटिझन्सनी व्यक्त केलं आश्चर्य

सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सासुने चक्क तिच्या सुनेला कडेवर उचलून घेतले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

कोलकाता, 18 जुलै : सोशल मीडिया हे एक असे प्लॅटफॉर्म आहे की ज्यावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. काही व्हायरल व्हिडीओ (Viral Video) तर इतके भन्नाट असतात की, ते युजर्सना अचंबित करणारे ठरतात. दरम्यान सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सासुने चक्क तिच्या सुनेला कडेवर उचलून घेतले आहे. सासू सुनेचे एक वेगळे नाते या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. असं म्हणतात की एक सासू कधीच सुनेची आई बनू शकत नाही, पण या व्हिडीओने या साऱ्या संकल्पना खोट्या ठरवल्या आहेत. यामध्ये सुनेची समजूत काढताना या सासुबाई दिसत आहेत. न्यूज18 बांग्लाने दिलेल्या माहितीनुसार या व्हिडीओमधील सून तिच्या नवऱ्यावर रागावली आहे. यानंतर तिचा राग कमी करण्यासाठी सासुनेच पुढाकार घेतला. तिने रागावलेल्या सुनेला जागेवरून उठवले आणि सुनेने देखील तिच्या कडेवर बसण्यात कोणताही संकोच दाखवला नाही. ती तिच्या सासुच्या कडेवर बसून तिच्या कुशीत जाऊन रडत होती. (हे वाचा- कोण आहे ही देशातील सर्वात श्रीमंत महिला? आता HCL च्या चेअरपर्सन पदाची जबाबदारी)

व्हिडीओमध्ये असे देखील वाटते आहे की, या साऱ्या प्रकारामुळे नवरा देखील नाराज आहे. पण सासुसुनेला त्यांच्या प्रेमापलीकडे काही फरक पडत नाही आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समजले नाही आहे, मात्र अनेकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर आलेल्या कमेंटमध्ये सोशल मीडिया युजर्सनी या दोघींची प्रशंसा केली आहे. (हे वाचा- उर्वशी रौतेलाचा स्टनिंग मॅगझिन लुक VIRAL, यावर्षी ‘या’ बोल्ड कव्हर फोटोंची चर्चा ) संपादन - जान्हवी भाटकर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात