मराठी बातम्या /बातम्या /देश /ठाकरे सरकारला दणका; JEE आणि NEET होणारच

ठाकरे सरकारला दणका; JEE आणि NEET होणारच

आतापर्यंत 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी प्रवेश पत्रे डाउनलोड केली आहेत.

आतापर्यंत 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी प्रवेश पत्रे डाउनलोड केली आहेत.

आतापर्यंत 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी प्रवेश पत्रे डाउनलोड केली आहेत.

नवी दिल्ली 4 सप्टेंबर: JEE आणि NEETची परीक्षा घेऊ नये या मागणीसाठी देशातल्या 6 राज्यांनी दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे ही परीक्षा रोखण्याचा शेवटाचा प्रयत्न अपयशी ठरला आहे. सुप्रीम कोर्टाने या आधीच या परीक्षांना हिरवी झेंडी दिली होती. आधीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी या राज्यांनी केली होती. महाराष्ट्र, पंजाब, झारखण्ड, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि छत्तीसगढ या सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती. मात्र कोर्टाने परीक्षा रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला दणका बसला आहे. या परीक्षा घेऊ नयेत अशी आग्रही मागणी राज्य सरकारने केली होती.

न्यामूर्ती अरुण मिश्रा यांच्या खंडपीठाने 17 ऑगस्टलाच परीक्षा घेण्याला परवानगी दिली होती. मात्र देशात कोरोनाची स्थिती पाहता ही परीक्षा घेण्यात येऊ नये अशी मागणी काही राज्यांनी केली होती. मात्र कोरोनामुळे जीवन थांबू शकत नाही. ही परीक्षा झाली नाही तर विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होईल असं सांगत न्यायालयाने परवानगी दिली होती.

1 ते 6 सप्टेंबर 2020 रोजी JEE परीक्षा होत आहे. तर, NEET परीक्षा 13 सप्टेंबरला आहे. नॅशनल टेस्टिंग एजेंसीने सुनावणीदरम्यान कोर्टात परीक्षा घेतांना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा केल्यानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. NEET 2020 परीक्षा मे महिन्यांत होणार होती, मात्र कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार नवीन रुग्णांची नोंद

दरम्यान,14 लाखाहून अधिक उमेदवारांनी या परीक्षांचे प्रवेश पत्रे डाऊनलोड केली आहेत.

JEE मुख्य परीक्ष आणि NEETसाठी प्रवेश पत्रेही देण्यात आली आहेत. आतापर्यंत 14 लाखाहून अधिक उमेदवारांनी दोन्ही परीक्षांसाठी प्रवेश पत्रे डाउनलोड केली आहेत.जेईई मेनसाठी नोंदणी केलेल्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी 7.41 लाख जणांनी प्रवेश पत्रे डाऊनलोड केली.

NEETसाठी फॉर्म भरलेल्या 15.97 लाख मुलांपैकी 6.84 लाख जणांनी प्रवेश पत्रे डाऊनलोड केली आहेत.

First published:

Tags: Suprim court