सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

सप्टेंबरच्या सुरुवातीला कोरोनाचा प्रकोप, 24 तासांत 84 हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह

1 हजार 096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 04 सप्टेंबर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातील कोरोनानं धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळत आहे. जून ते ऑगस्टच्या तुलनेत सर्व रेकॉर्ड मोडत नवीन धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत कोरोनाचा आकडा 39 लाखावर पोहोचला आहे.

गेल्या 24 तासांत म्हणजेच एक दिवसांत जवळपास सर्व रेकॉर्ड मोडून 83 हजार 341 नवीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत ही वाढ सर्वात मोठी आहे. तर 1 हजार 096 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात कोरोनाचे 8 लाख 31 हजार 124 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 30 लाख 37 हजार 152 लोक बरे झाले आहेत. या विषाणूमुळे आतापर्यंत 68 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीचा विचार करता 70 टक्के रुग्ण हे आंध्र प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे.जगभरात  कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताचा तिसरा तर मृत्यूदराबाबत 83 व्या स्थानावर आहे. 10 लाखांमागे 49 मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे. देशात मृत्यू दर घटणारा असला आणि रिकव्हरी रेट चांगला असला तरीही रोज जवळपास 76 हजारहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्यानं चिंतेची बाब आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 4, 2020, 10:12 AM IST

ताज्या बातम्या