Home /News /national /

कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी

कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! परीक्षांसाठी नवीन गाइडलाइन्स जारी

देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत.

    नवी दिल्ली, 03 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टानं NEET आणि JEE परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचा निर्णय दिल्यानंतर आता या प्रवेश परीक्षांसाठी गाइडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत. यानुसार कंटेनमेंट झोनमध्ये (Containment Zone) असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे. तसेच, परीक्षा स्टाफही परीक्षाकेंद्रांमध्ये उपस्थित नसतील. कंटेनमेंट झोनमध्ये असल्याने परीक्षा देण्यास असमर्थ विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था केली जाईल. देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याचे लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या मार्गदर्शक सूचनांमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या नवीन कार्यप्रणाली, एसओपीनुसार कंटेनमेंट झोनमध्ये राहणारे विद्यार्थी एकतर इतर मार्गांनी परीक्षेत भाग घेऊ शकतील किंवा शैक्षणिक संस्था नंतरच्या तारखेला त्यांची परीक्षा घेऊ शकतात. जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती. वाचा-NEET, JEE विद्यार्थ्यांसाठी धावला सोनू; म्हणाला, परीक्षा पुढे ढकलल्या नाही तर... पूर्णवेळ मास्क घालणे अनिवार्य आरोग्य मंत्रालयाच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार कंटेनमेंट झोनमध्ये येणारी परीक्षा केंद्रे नसतील. इतकेच नाही तर परीक्षा केंद्रात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्णवेळ मास्क घालणे बंधनकारक असेल. नवीन एसओपीचे उद्दीष्ट पद्धतशीर पद्धतीने परीक्षा आयोजित करणे हे आहे जेणेकरुन कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर एकत्र येऊ दिले जाऊ नये. या व्यतिरिक्त, विद्यार्थी व कर्मचार्‍यांसाठी फेस मास्क, हँड सॅनिटायझर्स, साबण इत्यादींची व्यवस्था संबंधित विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, परीक्षा घेणार्‍या अधिकाऱ्यांमार्फत करावी लागेल. वाचा-मुलांनो अभ्यासाला लागा! JEE आणि NEE मेन परीक्षा 'या' तारखेला होणार या गोष्टी ठेवा ध्यानात! - परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी आपल्या आरोग्याबद्दल डिक्लेरेशन द्यावा लागेल. - डिक्लेरेशनमध्ये माहिती चुकीची असल्यास परीक्षेस परवानगी दिली जाणार नाही. - पेन आणि पेपर आधारित चाचणी दरम्यान प्रश्नपत्रिका वितरित करताना, इनव्हिजिलेटरने त्यांचे हात स्वच्छ केले पाहिजेत. - उत्तरपत्रिका प्राप्त करताना हात सॅनिटायझ करणे गरजेचे आहे. - पेपर घेताना उत्तरपत्रिका 72 तासांनंतर उघडल्या जातील. - पत्रके वितरीत करताना आणि मोजणी करताना थुंकी वापरली जाणार नाही. - संगणक-आधारित परीक्षेदरम्यान, परीक्षेच्या आधी आणि नंतर अल्कोहोल वाइप्सद्वारे सिस्टम पूर्णपणे साफ केली जाईल.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या