देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षाही रद्द कराव्यात अशी मागणी पालक आणि विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आणि परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या. सप्टेंबरमध्ये या परीक्षा होणार आहेत. जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. हे वाचा - NEET, JEE साठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नका; सोनू सूदची केंद्राला विनंती मात्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात टाकू नका, परीक्षा पुढे ढकला. अशी विनंती अभिनेता सोनू सूदने केंद्र सरकारकडे याआधी केली आहे. देशातील सध्याची परिस्थिती पाहता नीट आणि जीईई त्या परीक्षा पुढे ढकलाव्यात अशी माझी केंद्र सरकारकडे विनंती आहे. सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत आपण खूप काळजी घ्यायला हवी, विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये", असं ट्वीट त्याने केलं होतं. हे वाचा - कडक! लाखो रुपयांची नोकरी सोडली, नक्षलग्रस्त भागात मुलांना शिकवतंय हे दाम्पत्य दरम्यान या परीक्षेबाबत प्रत्येक राज्यांचं मत वेगवेगळं आहे. काही राज्यांनी परीक्षा घेण्याची भूमिका घेतली आहे तर काही राज्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. आता महाराष्ट्र, राजस्थान, प.बंगाल, छत्तीसगड, झारखंड, पंजाबचाही या राज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या राज्यांनी पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.“ I N C A S E “ #JEE_NEET doesn’t get postponed. pic.twitter.com/D2iYzt4wf4
— sonu sood (@SonuSood) August 28, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonu Sood