मुंबई, 22 ऑगस्ट : JEE आणि NEEची परीक्षा होणार की नाही या वादाला आता पूर्णविराम मिळाला आहे. या दोन्ही परीक्षा नियोजित वेळेत होणार असून विद्यार्थ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण नीट आणि जेईई परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. यासंदर्भात राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं परीपत्रक जारी केलं आहे. जेईईची मुख्य परीक्षा ठरलेल्या तारखेप्रमाणे 1 ते 6 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरला होणार आहे. नीट परीक्षेसाठी 15,97,433 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानं जेईई आणि नीट परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यासंदर्भात 11 विद्यार्थ्यांची याचिका फेटाळून लावली होती.
— National Testing Agency (@NTA_Exams) August 21, 2020
हे वाचा- नेटवर्क नाही म्हणून गावापासून दूर जंगलात येऊन केला ऑनलाइन क्लास कोरोना काळात ही परीक्षा रद्द करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली होती. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते. असं म्हटलं होतं. कोरोनामुळे ही परीक्षा जुलैपर्यंत पुढे ढकलण्यात आली. दरम्यान कोरोनाची वाढती प्रकरणं लक्षात घेता आता 13 सप्टेंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थी आणि पालकांकडून परीक्षा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. मात्र ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं यासंदर्भात ट्वीट करून परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.