नवी दिल्ली 1 जुलै: आज 1 जुलै 2021. 1 जुलै दरवर्षी भारतात राष्ट्रीय डॉक्टर्स दिन (National Doctor’s Day 2021) म्हणून साजरा केला जातो. कोरोना (Coronavirus) महामारीच्या काळात तर आपल्याला डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामामुळे थक्क करून टाकलं. खरोखरच हे कोरोना योद्धे लढत होते आहेत म्हणूनच अनेकांचे प्राण वाचले आणि वाचत आहेत. सामान्यपणे लोक डॉक्टरांना देव मानतात. देवाकडून जेवढी अपेक्षा आणि आशा सामान्य माणासाला असते ना तितकीच तो आजारपणात डॉक्टरांकडून ठेवत असतो. डॉक्टर त्याला खरे उतरतात आणि रुग्णानी दाखवलेला विश्वास खरा करून दाखवतात. पण कर्तव्यावर (Duty) असताना म्हणजे काम करताना डॉक्टरांना खासगी तसंच प्रोफेशनल आव्हानांचा (Professional Problems) सामना करावा लागतो. त्याबाबत रुग्णांना (Patients) फारसं माहीत नसतं. कर्तव्य बजावताना डॉक्टरांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो याबाबत आम्ही लखनऊमधल्या किंग्ज जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीतील पल्मनरी अँड क्रिटिकल केअर मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. वेदप्रकाश यांच्याशी संवाद साधला. जाणून घेऊया डॉक्टरांना सामना कराव्या लागणाऱ्या आव्हानांविषयी. स्वत: च्या आधी करावी लागते रुग्णाची चिंता डॉक्टर वेदप्रकाश यांचं म्हणणं आहे, की एखाद्या डॉक्टरसमोरचं सर्वांत पहिलं आव्हान म्हणजे स्वत: चा विचार किंवा दुखणं तसंच महत्त्वाचं काम बाजूला ठेवून दुसऱ्याचा म्हणजेच रुग्णाचा विचार आधी करणं. त्याच्या सेवेसाठी कुठल्याही डॉक्टरला तत्पर रहावं लागतं. ते म्हणाले,‘बाहेर फिरायला जाणं किंवा लग्न समारंभात जाणं तर दूरच आमच्यावर तर आमच्या कुटंबीयांच्याही आधी रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी असते. खरं तर आम्हीच वैद्यकीय क्षेत्रात (Medical Field) काम करत असल्याने आमचे कुटुंबीय पण आमच्याकडूनच अपेक्षा करतात पण त्यांची अपेक्षाही आम्ही पूर्ण करू शकत नाही. कारण आमचा वसुधैव कुटुंबकम् या संस्कृत वचनावर विश्वास असतो, म्हणजे आम्ही हे विश्वची माझे घर असं मानतो.’
‘आई कुठे…’ फेम संजनाचा फिटनेस फंडा; जिममधील VIDEO होतोय VIRAL
शत्रूवरही उपचार करताना लावतो प्राणांची बाजी डॉ. वेदप्रकाश म्हणाले, ‘ डॉक्टर स्वत: कुटुंबीयांपेक्षाही रुग्णांना कसं महत्त्व देतात याचं माझ्याच आयुष्यातलं उदाहरण देतो. काही दिवसांपूर्वी माझी बायको कोविड-19 पॉझिटिव्ह झाली होती. आता अर्थात नवराच डॉक्टर आहे म्हटल्यावर तो आपल्यावर उपचार करेल ही कुठल्याही पत्नीची स्वाभाविक इच्छा असणारच. त्यात आमच्या कुटुंबात माझ्याव्यतिरिक्त अन्य कुणी पुरुष नाही, त्यामुळे ही अपेक्षा अधिक वाढते. पण त्याही काळात मला तिच्याआधी रुग्ण तपासायला प्राधान्य द्यावं लागलं. मी तिची काळजी घेऊ शकलो नाही. डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना एक शपथ दिली जाते, ती हिच असते की रुग्णांची जबाबदारी आमच्यासाठी इतर सगळ्या जबाबदाऱ्यांहून महत्त्वाची असेल. ही शपथ पाळण्यासाठी आम्हाला कुटुंबीयांना आजारपणात सोडूनही रुग्णांची सेवा करायला जावं लागतं. मग अगदी समोर शत्रू (Enemy)जरी रुग्ण म्हणू आलेला का असेना. आमच्या शपथेला जागत आम्ही शत्रूवरही उपचार करताना प्राणांची बाजी लावतो.’ सगळंच आमच्या हातात नसतं डॉक्टरांना घरातील व्याप असतात तसेच हॉस्पिटलमधलेही व्याप असतात. त्यात सतत कार्यतत्पर राहण्याची जबाबदारी खांद्यावर असते. त्यामुळे त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. त्याबद्दल डॉ. वेदप्रकाश म्हणाले, ‘ डॉक्टरांसमोर सर्वांत मोठं आव्हान म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे थोडक्यात त्या रुग्णाचा जीव वाचवणं किंवा त्याला बरं करणं. ते सगळे डॉक्टरांना देव मानतात आणि त्यांना वाटतं की सगळं काही डॉक्टरांच्याच हातात आहे. पण खरं तर आम्ही काही देव नाही आम्ही पण चार-चौघांसारखी माणसंच असतो. डॉक्टर, नर्स किंवा मेडिकल क्षेत्रातला कुठलीही व्यक्ती रुग्णाला बरं करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतो. पण कधीकधी हजारो-लाखो प्रयत्नांनंतरही रुग्णाच्या नातेवाईकांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू शकत नाही. त्याच कारण तेचं असतं की रुग्णावर उपचार करणं आमच्या हातात त्यापुढे देवाची इच्छा.
एका बाईकवर चार प्रवासी, अचानक गाडीतून बाहेर पडला साप अन्…; पाहा Shocking Video
सगळंच डॉक्टरांच्या हातात नसतं. पण जर एखाद्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर त्यांच्या भावनांचा उद्रेक होतो आणि ते बोलतील ते सहन करणं आम्हाला क्रमप्राप्त असतं. कारण ते त्यावेळी दु:खात असतात. जसं आम्ही त्यांच्या भावना समजून घेतो तसंच या लोकांनीही हे लक्षात घ्यायला हवं की त्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे वैद्यकीय क्षेत्रातील लोकांच्या मनांनाही ठेच पोहोचत असते.’ डॉक्टरांचं काम थँकलेस जॉब असतो असं म्हटलं जातं. त्यांना 24 तास तत्पर रहावं लागतं. कुठे प्रवासाला गेले किंवा विमानातून प्रवास करत असले तरीही इमर्जन्सीत त्यांना बोलवलं जातं आणि डॉक्टरांना त्यांचं कर्तव्य पार पाडावंच लागतं. ते आपलं कर्तव्य पार पाडतातच. इतक्या आव्हानांना तोंड देऊनही आपलं कर्तव्य चोख बजावणाऱ्या डॉक्टरांना आज राट्रीय डॉक्टर्स दिनी आपण सलाम करूया.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.