‘आई कुठे काय करते’ ही मराठी मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. तसेच या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखासुद्धा भाव खावून जातं आहे. अशीच एक लोकप्रिय झालेली व्यक्तिरेखा म्हणजे संजना आणि ती साकारणारी अभिनेत्री आहे रुपाली भोसले. अभिनेत्री रुपालीच्या स्टाईलिश आणि बिनधास्त अंदाजाचे अनेक चाहते आहेत. मात्र स्वतः ला फिट आणि सुंदर ठेवण्यासाठी ती तितकेच कष्ट देखील घेत असते. (हे वाचा:दिग्दर्शकाला मांड्या आणि क्लिवेज पाहायचं होतं’;आश्रम फेम अभिनेत्रीचा खुलासा ) नुकताच रुपालीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती ट्रेडमील वर्कआऊट करत असल्याचं दिसत आहे. सध्या ती जिममध्ये प्रचंड घाम गाळत आहे. आज स्वतःला फिट आणि ऍक्टीव्ह ठेवण्यासाठी एक्सरसाईज करने खुपचं महत्वाचं बनलं आहे. आणि म्हणूनचं लॉकडाऊनचा हा संपूर्ण काळ अनेक अभिनेत्रींनी फक्त आणि फक्त आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यात खर्च केलं आहे. सध्या रुपालीचे सुद्धा एक्सरसाईजचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. रुपालीची मेहनत पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. (हे वाचा: रेखा ते लीला चंदावरकर... तरुणपणीच विधवा झाल्या या बॉलिवूड अभिनेत्री) रुपालीला ‘बिग बॉस मराठी 2’ मधून मोठी लोकप्रियता मिळाली होती. ती एक उत्तम स्पर्धक समजली जात होती. तसेच रुपालीने हिंदीमधील ‘बडी दूर से आये है’ या मालिकेतसुद्धा काम केलं आहे. यामध्ये अभिनेता सुमित राघवन तिचा सह कलाकार होता. सध्या रुपाली भोसले ही अंकित मगरेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Health, Marathi actress, Marathi entertainment, Wellness