Home /News /national /

व्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो मोठा विध्वंस; नासानंही केलं Alert

व्हॅलेंटाईन डे च्या 3 दिवस अगोदरच पृथ्वीवर होऊ शकतो मोठा विध्वंस; नासानंही केलं Alert

काही लघुग्रह थेट समुद्रात जाऊन पडतात. पण कधी कधी काही मोठे लघुग्रहही पृथ्वीवर पडतात. त्यांच्यामुळे होणारा विध्वंस कल्पनेच्या पलिकडे असू शकतो.

    नवी दिल्ली, 28 जानेवारी : छोटे-मोठे लघुग्रह (Asteroid Attack) अनेकदा अवकाशातून थेट पृथ्वीवर येऊन पडत असतात. यापैकी काही अगदी लहान असतात. तर काही लघुग्रह थेट समुद्रात जाऊन पडतात. पण कधी-कधी काही मोठे लघुग्रहही पृथ्वीवर पडतात. त्यांच्यामुळे होणारा विध्वंस कल्पनेच्या पलिकडे असू शकतो. अशा लघुग्रहांच्या इतिहासाबद्दल सांगायचे झाल्यास, असे म्हटले जाते की याआधी जेव्हा महाकाय लघुग्रह पृथ्वीवर आदळला होता, तेव्हा डायनासोर पृथ्वीवरून नष्ट झाले होते. आता 'नासा'ने (Nasa) दिलेल्या माहितीनुसार 11 फेब्रुवारीला एक लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून जाईल. जर कदाचित तो पृथ्वीवर आदळला तर होणारा विनाश अतिशय भयंकर असेल, असे सांगण्यात आले आहे. या लघुग्रहाचा आकार एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षा खूप मोठा आहे. तसेच, हा लघुग्रह अवघ्या काही आठवड्यांत पृथ्वीच्या जवळ येईल. त्याला 138971 (2001 CB21) असे नाव देण्यात आलं आहे. यासोबतच नासाने त्याची गणना संभाव्य धोक्यांमध्ये केली आहे. त्याची रुंदी 4 हजार 265 फूट इतकी आहे. नासाकडून पृथ्वीजवळून जाणाऱ्या लघुग्रहांच्या यादी बनवण्यात आली असून त्यामध्ये या ग्रहाता समावेश आहे. जरी हा पृथ्वीच्या सर्वात जवळून जाणारा लघुग्रह असला तरी प्रत्यक्षात तो पृथ्वीपासून तीन दशलक्ष मैल दूरवरूनही जाण्याची शक्यता आहे. हे वाचा -हेल्दी नव्हे अनहेल्दी ठरेल Milk Powder; साईड इफेक्ट वेळीच माहीत करून घ्या हा लघुग्रह 21 फेब्रुवारी 1900 रोजी पहिल्यांदा दिसला होता. तेव्हापासून तो जवळजवळ दरवर्षी सौर यंत्रणेच्या जवळून जातो. यापूर्वी हा लघुग्रह 18 फेब्रुवारी 2021 रोजी शेवटचा दिसला होता. त्याआधी 2011 मध्ये आणि पुन्हा 2019 मध्ये तो दिसला होता. सध्या नासाने तो नेमका कोठून जाईल हे सांगितलेले नाही, पण 11 फेब्रुवारीला आणि त्यानंतर 24 एप्रिलला पृथ्वीजवळून जाणार असल्याचे निश्चितपणे सांगितले आहे. हे वाचा - तुम्हीही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोलो-650 गोळी घेता? मग हे दुष्परिणाम एकदा वाचाच त्यानंतर हा लघुग्रह जानेवारी 2024 मध्ये, त्यानंतर जूनमध्ये आणि पुन्हा डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष दिसेल. नासाच्या गणनेनुसार, हा लघुग्रह 11 ऑक्टोबर 2194 पर्यंत पृथ्वीच्या फार जवळून जाईल. खरंतर असे अनेक लघुग्रह आहेत, जे पृथ्वीच्या जवळून जातात, परंतु त्यांची माहिती उपलब्ध नाही. यासाठी नासाने एक प्रकल्प सुरू केला आहे, ज्यामुळे ही समस्या संपुष्टात येऊ शकते. खरे तर असे लघुग्रह ज्यांची माहिती उपलब्ध नाही, त्यांची चुकून पृथ्वीशी टक्कर झाली तर विनाश निश्चित आहे. यासाठी अशा ग्रहांवर विशेष लक्ष ठेवले जाते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nasa, Valentine day

    पुढील बातम्या