स्वीस बँकेत कुणाचे पैसे ? स्वित्झर्लंडनं जाहीर केली 50 भारतीयांची नावं

स्वीस बँकेत कुणाचे पैसे ? स्वित्झर्लंडनं जाहीर केली 50 भारतीयांची नावं

स्वीस बँकेनं 50 भारतीयांची नावं जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 जून : देशात आणि देशाच्या राजकारणात काळ्या पैशाचा मुद्दा अग्रस्थानी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडनं स्वीस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्यांविरोधात कारवाई करायला सुरूवात केली आहे. त्यानुसार 50 भारतीयांची नावं ही भारताकडे सोपवण्यात येणार आहेत. भारत सरकारला याबाबतची माहिती देण्यापूर्वी 50 भारतीयांना अपिल करण्याची देखील संधी देण्यात आली आहे. काळा पैसा असणाऱ्यांमध्ये विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तिंचा समावेश आहे. भारतासोबत इतर देशांना देखील काळ्या पैशाची माहिती देण्याची प्रक्रिया स्वित्झर्लंडनं सुरू केली आहे. मागील काही दिवसांमध्ये भारताला काळ्या पैशाबाबत माहिती देण्याची प्रक्रिया वेग धरताना दिसत आहे. सध्या देशात देखील काळ्या पैशाचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चिला जात आहे.

लग्नास नकार! प्रेयसीचा प्रियकरावर अ‍ॅसिड हल्ला

50 भारतीयांना नोटीस

स्वित्झर्लंडनं 50 भारतीयांना नोटीस पाठवली आहे. यामध्ये भारत सरकराला माहिती देण्यापूर्वी अपिलाची एक संधी देण्यात आली आहे. 21 मे रोजी 11 भारतीयांना नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये 1949मध्ये जन्म झालेल्या कृष्ण भगवान रामचंद आणि 1972मध्ये जन्म झालेल्या कल्पेश हर्षद किनारीवाला यांचा समावेश आहे.

पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक - अमित शहा

काही नावांमधील सुरूवातीचे अक्षर आले समोर

तसंच स्वीस बँकेतील खात्यासंदर्भात काही नावांचे सुरूवातीची अक्षरं समोर आली आहेत. यामध्ये 24 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेले एसएसबीके, 9 जुलै 1944 रोजी जन्म झालेले बीकेआय, 2 नोव्हेंबर 1983 रोजी जन्म झालेल्या पीएएस, 22 नोव्हेंबर 1973 रोजी जन्म झालेल्या आरएएस, 27 नोव्हेंबर 1944 रोजी जन्म झालेल्या एपीएस, 14 ऑगस्ट 1949 रोजी जन्म झालेले एडीएस, 20 मे 1935 रोजी जन्म झालेले एमएलए, 21 फेब्रुवारी 1968 रोजी जन्म झालेले एनएमए आणि 27 जून रोजी जन्म झालेले एमएमए यांच्या नावांचा समावेश आहे. या सर्वांना अपिलासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोणाकडे कोणतं खातं? पाहा VIDEO

First published: June 17, 2019, 9:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading