नवी दिल्ली, 17 जून : लग्नास नकार किंवा एकतर्फी प्रेमातून मुलींवर अॅसिड हल्ल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. पण, प्रेयसीनं प्रियकरावर अॅसिड हल्ला केल्याचं तुम्ही केव्हा ऐकलं आहे? राजधानी दिल्लीमध्ये प्रेयसीनं प्रियकरावर हेल्मेट काढून अॅसिड हल्ला केला आहे. लग्नास नकार दिल्यानं प्रेयसीनं प्रियकरावर अॅसिड हल्ला केला आहे. हल्ल्यावेळी प्रेयसी आपल्या प्रियकरासोबत बाईकवरती होती. या हल्ल्यामध्ये प्रेयसीच्या हाताला इजा झाली आहे. तर, प्रियकराच्या चेहरा, मान आणि छातीला इजा झाली आहे. सध्या प्रियकरावर रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. काय आहे प्रकरण मागील 3 वर्षापासून दोघांचं प्रेम होतं. त्यानंतर प्रेयसीनं लग्नासाठी प्रियकराकडे लग्न करू अशी विचारणा केली. पण, प्रियकरानं नकार दिला. त्यामुळे रागानं लालबुंद झालेल्या प्रेयसीनं प्रियकराला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर देखील तिनं प्रियकराकडे लग्नाची विचारणा केली. पण, प्रियकराचा नकार मात्र कायम होती. अखेर एक दिवस प्रेयसीनं अॅसिड विकत घेत ते पर्समध्ये ठेवून दिलं. त्यानंतर तिनं बाईकवर असताना प्रियकराला लग्नाची विचारणा केली. पण, प्रियकराचा नकार कायम होता. त्यामुळे राग आलेल्या प्रेयसीनं हेल्मेट काढून प्रियकरावर अॅसिड हल्ला केला. …तरूणीनं दिली कबुली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता दोघांनी देखील चालत्या बाईकवर अॅसिड हल्ला झाल्याची माहिती दिली. पण, पोलिसांनी दुसऱ्यांदा याबाबतची चौकशी केली असता प्रियकरानं प्रेयसीनं हेल्मेट काढायला सांगून अॅसिड फेकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी प्रेयसीची रवानगी ही तुरूंगात केली आहे. आरोपी प्रेयसी सध्या पदवीचं शिक्षण घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.