नवी दिल्ली, 17 जून : ICC Cricket World Cup मध्ये रविवारी (16 जून) झालेल्या हायव्होल्टेज सामन्यात टीम इंडियानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 89 धावांनी हरवलं. भारतानं पाकिस्तानसमोर 337 धावांचे आव्हान ठेवलं होतं. पावसामुळे पाकिस्तानला डकवर्थ लुईस नियमानुसार 5 षटकांत 136 धावांचे अशक्यप्राय आव्हान देण्यात आलं मात्र त्यांचा खेळ 212 धावांवर आटोपला आणि भारताने 89 धावांनी विजय मिळवला. वर्ल्ड कपदरम्यान भारतानं पाकिस्तानवर मिळवलेला हा सातवा विजय आहे. या विजयानंतर टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही टीम इंडियाला ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या. त्याचं हे ट्विट सर्वाधिक चर्चेत राहिलं आहे. ‘आणखी एक स्ट्राईक’ टीम इंडियाच्या विजयावर अमित शहा यांनी ट्विट केलं की,‘टीम इंडियाचा पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राईक आणि याचे परिणामदेखील तसेच दिसून आले आहेत.’ पुढे त्यांनी असंही म्हटलं की, ‘शानदार खेळीसाठी संपूर्ण टीमचे अभिनंदन. प्रत्येक भारतीय नागरिकाला या विजयावर गर्व आहे आणि याचा जल्लोष साजरा केला जात आहे.’ अमित शहांचं हे ट्विट सोशल मीडिया प्रचंड शेअर केले जात आहे आणि युजर्सकडून यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रियादेखील व्यक्त करण्यात आल्या आहेत. (वाचा : VIDEO : INDvsPAK : 25 चेंडूत बाजी पलटली, कुलदीप-पांड्याने केली कमाल!)
(वाचा : World Cup : Point Table : भारताविरुद्ध पराभवाने पाकिस्तानला झटका, पुढची वाटचाल) तीन वेळा पावसाचा व्यत्यय भारताने प्रथम फलंदाजी करताना हिटमॅन रोहित शर्माच्या वेगवान शतकी खेळीच्या जोरावर भारतानं 336 धावा केल्या. भारताचा सलामीवीर शिखर धवन दुखापतीमुळे बाहेर असल्यानं त्याच्या जागी खेळणाऱ्या केएल राहुलनं सलामीला येऊन अर्धशतकी खेळी केली. त्याने रोहित शर्मासोबत अर्धशतकी भागिदारी करून दमदार सुरुवात करून दिली. केएल राहुल 57 धावांवर बाद झाला. त्याने रोहित शर्मासोबत 136 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित शर्माने शतक साजरं केलं. रोहित शर्माने 113 चेंडूत 140 धावा केल्या. यात त्याने 14 चौकार आणि 3 षटकार मारले. तर, त्यानंतर विराटनं 77 धावांची खेळी केली. पाकिस्तानच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचा आणि दिशाहीन गोलंदाजीचा फटका त्यांना बसला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्या 20 षटकांत एकदाही पायचितचे अपील केलं नाही. त्यांना तशी संधीच भारतीय फलंदाजांनी दिली नाही. रोहित बाद झाला. त्यानंतर कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. ऑस्ट्रेलिया विरोधातही हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. त्यावेळी त्यानं 48 धावांची तुफान खेळी केली होती. मात्र, या सामन्यात पांड्या केवळ 26 धावा करत बाद झाला. तर, दुसरीकडे कोहलीनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या सामन्यात पाकिस्ताननं प्रथम टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पण पाकिस्तानला त्यांचा हा निर्णय महागात पडत आहे. शेवटच्या पाच ओव्हरमध्ये पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, मात्र केदार जाधव आणि विजय शंकर यांनी 22 धावा केल्या. (वाचा : World Cup : INDvsPAK : सामना संपण्याआधीच आफ्रिदीने भारताचं केलं अभिनंदन!) यानंतर भुवनेश्वर कुमारचे पायांचे स्नायू अकडल्यामुळं त्याची ओव्हर विजय शंकरनं पूर्ण केली. त्याच्या 4 चेंडूवर शंकरनं इमानला 7 धावांवर बाद केले. त्यानंतर फकर आणि बाबर या जोडीने शतकी भागिदारी केली. ही जोडी भारताच्या विजयाच डोकेदुखी ठरत असतानाच कुलदीपने 23व्या षटकात बाबरची विकेट घेत पाकला दुसरा दणका दिला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात पुन्हा एकदा कुलदीपने फकरला बाद करत पाकिस्तानची तिसरी विकेट घेतली. चायनामॅन कुलदीपच्या पाठोपाठ हार्दिकने मोहम्मद हाफिज आणि त्यानंतर शोएब मलिकला शून्यावर बोल्ड पाकिस्तानला दोन धक्के दिले. त्यानंतर विजय शंकरने पाकिस्तानचा कर्णधार सर्फराजला बाद करत सहावा धक्का दिला. पावसानंतर खेळ 40 षटकांचा करण्यात आला. SPECIAL REPORT : मोटिव्हेशनल स्पीकरच्या भूमिकेत राज ठाकरेंनी दिला सक्सेस मंत्र