जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Corona Effect : कोट्यवधींची कार विकणारी कंपनी आता करत आहे 'हा' व्यवसाय

Corona Effect : कोट्यवधींची कार विकणारी कंपनी आता करत आहे 'हा' व्यवसाय

Corona Effect : कोट्यवधींची कार विकणारी कंपनी आता करत आहे 'हा' व्यवसाय

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक बड्या कंपन्यांना त्यांचे उत्पादन थांबवावं लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 30 एप्रिल : जगभरात एकीकडे कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. तर यामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीतही अनेक कंपन्या नागरिकांना उपयुक्त होतील अशा वस्तु तयार करण्याकडे वळल्या आहेत. कुणी मास्क तयार करतंय तर कुणी सॅनिटायझर तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. अशातच आता चर्चा आहे ती Rolls Royce कंपनीची. करोडो रुपयांची गाडी तयार करणारी ही कंपनी सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे. याचं कारणही तितकच खास आहे. करोडोंची कार सोडून आता ही कंपनी सध्या कोरोनामुळे मध तयार करण्याचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळत आहे. लॉकडाऊन दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची विक्री फक्त सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना उपयुक्त होतील आणि नफा मिळेल असं उत्पादन म्हणजे मध. त्यामुळे या कंपनीनं मध तयार करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्रिटीश कार कंपनी रोल्स रॉयसने वेगळा दृष्टीकोन स्वीकारला आहे. या लक्झरी कारची निर्मिती करणाऱ्या कंपनीनं मध तयार करण्यास सुरुवात केली आहे. हे वाचा : कोरोनाव्हायरशी लढण्यासाठी 100 वर्ष जुन्या महासाथीत डोकावण्याची गरज कंपनीने यासाठी 42 एकर जागेत  प्लांट उभारला आहे. इथे विशिष्ट प्रकारच्या मधमाशा पाळल्या जात असून त्यांच्यापासून मध काढण्याची प्रक्रिया केली जाते. ब्रिटनमधील मधमाशांच्या संवर्धनात मदतीचा हात म्हणून रोल्स रॉयल कंपनीनं हा व्यवसाय सुरू केल्याचा दावा केला आहे. यासोबत फूल बागायतदार आणि शेतकऱ्यांनाही मदत करत आहे. या प्रकल्पातून तिघांचाही फायदा होत असल्याचं कंपनीचा म्हणणं  आहे. वाचा : ‘हे’ Mobile app तुम्हाला जीवघेण्या कोरोनाव्हायरसपासून वाचवणार संपादन- सूरज यादव

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात