भोपाळ 10 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात धर्मांतराचं वेगळं प्रकरण समोर आलं आहे. यात एका मुस्लीम मुलीने हिंदू धर्म स्वीकारून लग्न केलं. शुक्रवारी संध्याकाळी पंचतत्व स्नान आणि पूजा करून तिने हिंदू धर्म स्वीकारला. हे एक प्रेमप्रकरण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुस्लीम मुलीचं हिंदू तरुणावर प्रेम जडलं आणि युवकासोबत राहाण्यासाठी ती हिंदू धर्म स्विकारण्यास तयार झाली. ‘प्लिज लिफ्ट द्या’; सुनसान रस्त्यावर महिलेनं मागितली लिफ्ट अन्.., पुढे घडलं भयानक आता धर्म बदलल्यानंतर मुलीचे कुटुंब आणि काही लोक त्यांना धमक्या देत आहेत. यामुळे तरुण-तरुणी दोघेही सुरक्षेची मागणी करत आहेत. राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणारी इकरा ही राहुल वर्मा नावाच्या मुलाच्या प्रेमात पडली होती. राहुल हा मूळचा मंदसौर जिल्ह्यातील आहे. त्याचं कुटुंब मंदसौर येथे राहतं. या दोघांमध्ये तीन वर्षांपूर्वी प्रेमप्रकरण सुरू झालं, तेव्हा दोघंही अल्पवयीन होते. पण आता प्रौढ होताच दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान राहुलने तरुणीला आपण हिंदू असल्याचं सांगितल्यावर तरुणीनेही राहुल वर्माशी लग्न करून हिंदू धर्म स्वीकारण्यास होकार दिला. राहुलच्या कुटुंबीयांची या लग्नाला काहीही हरकत नव्हती. त्याच्या कुटुंबीयांनी मंदसौरच्या गायत्री परिवार इथे करार विवाह करून हिंदू रितीरिवाजांनुसार दोघांचं लग्न लावलं. ‘माझ्या शरीरातील तुकडा काढून देतो पण…’; शिक्षा नव्हे आजारातून बाबांना वाचवण्यासाठी 17 वर्षीय लेक सुप्रीम कोर्टात याबाबत बोलताना मुलीने सांगितलं की तिने हे पाऊल स्वतःच्या इच्छेनं उचललं आहे. मात्र, आता ती जोधपूरमध्ये असलेल्या तिच्या कुटुंबियांपासून आणि मुस्लीम समाजातील लोकांपासून आपल्याला धोका असल्याचं सांगत आहे. या कारणामुळे युवक आता त्यांना दोघांना सुरक्षा देण्याची मागणी करत आहे. चैतन्य सिंग यांच्यानंतर धर्मांतराचं हे दुसरं प्रकरण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.