चंदीगड, 26 डिसेंबर: पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर मुस्लीम मुलगी स्वत: च्या मर्जीने कोणाशीही विवाह करून शकते, (Muslim Girl Can Marry Anyone on Attaining Puberty) असा निकाल पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने (panjab and haryana high court) दिला आहे. यावेळी न्यायालयाने कुटुंब आणि नातेवाईकांच्या विरोधात जाऊन हिंदू मुलाशी लग्न करणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुस्लीम मुलीला आणि तिच्या पतीला सुरक्षा पुरवण्याचे आदेश देखील न्यायालयाने दिले आहेत. मुस्लीम मुलीने पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर, तिला तिचा जोडीदार निवडण्याचा हक्क आहे, यामध्ये तिचे आई वडील किंवा नातेवाईक हस्तक्षेप करू शकत नाही, असंही न्यायालयाने यावेळी म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, न्यायमूर्ती हरनरेश सिंग गिल यांनी म्हटलं की, ‘मुस्लीम मुलीचा विवाह मुस्लीम पर्सनल लॉद्वारे केला जातो, हा कायदा स्पष्ट आहे. सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मडन लॉ’ या पुस्तकातील कलम 195 नुसार, याचिकाकर्ता मुलगी 17 वर्षीय असल्याने ती तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करण्यास सक्षम आहे. तसेच याचिकाकर्ता नवऱ्या मुलाचं वय देखील 33 वर्षे आहे. त्यामुळे याचिकाकर्ता मुलगी मुस्लीम पर्सनल लॉनुसार विवाहयोग्य वयाची आहे. हेही वाचा- नितीन राऊत यांना काँग्रेस हायकमांडचा दणका, SC अध्यक्षपदावरून हटवलं! न्यायमूर्ती गिल पुढे म्हणाले, केवळ याचिकाकर्त्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न केलं म्हणून त्यांना संविधानातील मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवता येणार नाही. याची भीती याचिकाकर्त्यांच्या मनातून घालवण्याची गरज आहे. हेही वाचा- Mann ki Baat: लसीकरणात भारत अव्वल; Omicron पासून सावध राहण्याची गरज- PM मोदी याचिकाकर्त्याच्या वकिलांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, ‘मुस्लीम पर्सनल लॉ’नुसार वयाच्या 15 व्या वर्षी एखादी व्यक्ती प्रौढ बनते. त्यामुळे मुस्लीम मुलगा किंवा मुस्लीम मुलगी पौगंडावस्थेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्या पसंतीच्या कोणत्याही व्यक्तीशी ते लग्न करू शकतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कोणताही अधिकार नाही.’ त्यांनी पुढे सांगितलं की, सर दिनशाह फरदुनजी मुल्ला यांच्या ‘प्रिन्सिपल्स ऑफ मोहम्मडन लॉ’ या पुस्तकातील कलम 195 मध्ये लग्नाविषयी भाष्य करण्यात आलं आहे. त्यानुसार निरोगी बुद्धीचा प्रत्येक मुस्लीम व्यक्ती पौगंडावस्थेत विवाह करू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.