मराठी बातम्या /बातम्या /देश /

लसीकरणात भारत अव्वल; Omicron पासून सावध राहण्याची गरज, PM मोदींनी 'मन की बात'मधून केलं संबोधित

लसीकरणात भारत अव्वल; Omicron पासून सावध राहण्याची गरज, PM मोदींनी 'मन की बात'मधून केलं संबोधित

Mann ki Baat Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात'द्वारे देशाला संबोधित केलं आहे. त्यांचा हा 84 वा रेडिओ कार्यक्रम (84th episode) होता.

Mann ki Baat Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात'द्वारे देशाला संबोधित केलं आहे. त्यांचा हा 84 वा रेडिओ कार्यक्रम (84th episode) होता.

Mann ki Baat Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात'द्वारे देशाला संबोधित केलं आहे. त्यांचा हा 84 वा रेडिओ कार्यक्रम (84th episode) होता.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 26 डिसेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM narendra modi) यांनी रविवारी सकाळी 11 वाजता 'मन की बात'द्वारे (Mann ki Baat) देशाला संबोधित केलं आहे. त्यांचा हा 84 वा रेडिओ कार्यक्रम (84th episode) होता. आजच्या मन की बात कार्यक्रमातून, पंतप्रधान मोदींनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी कोविड-19 विरुद्धच्या लढ्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, 'कोरोना विषाणूचा नवीन व्हेरिएंट सर्वाधिक संसर्गजन्य असल्याने आपण स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. ओमिक्रॉन विषाणूवर आपले शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. पण कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंट विरुद्धच्या लढाईत स्वतःची जागरूकता, स्वतःची शिस्त हीच आपली ताकद ठरणार आहे.' यावेळी नरेंद्र मोदी यांनी सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेचा देखील उल्लेख केला. या दुर्घटनेत मृत पावलेल्या जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी त्यांनी कॅप्टन वरूण सिंह यांच्या व्हायरल झालेल्या पत्राचा देखील उल्लेख केला. पंतप्रधानांनी 'मन की बात'मध्ये सांगितलं की, यावर्षीही देखील परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचा माझा विचार आहे. या कार्यक्रमाची नोंदणी देखील दोन दिवसांनंतर MyGov.in वर 28 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ही नोंदणी 28 डिसेंबर ते 20 जानेवारीपर्यंत सुरू चालणार आहे. यामध्ये इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाइन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे, असंही मोदींनी यावेळी म्हटलं हेही वाचा-स्वतःच्या शेणात लोळणारी गाय माता कशी असू शकेल? - दिग्विजय सिंग लसीकरणाबाबत बोलताना पीएम मोदी म्हणाले की, आज जगभरातील लसीकरणाच्या आकडेवारीची भारताशी तुलना केली, तर भारताने किती अभूतपूर्व काम केलं आहे, हे दिसतं. भारताने आतापर्यंत देशात 140 कोटी डोसचा टप्पा पार केला आहे. हे प्रत्येक भारतीयांचं यश आहे. लसीकरणाच्या बाबतीत भारत हा अव्वल क्रमांकावर आहे. पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी सरकारी कार्यालयांत जुन्या फाईली आणि कागदपत्रे असायची. जेव्हापासून नवीन सरकारने जुन्या पद्धती बदलण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून या फाईली आणि कागदपत्रांचे ढीग डिजीटल होऊन संगणकाच्या फोल्डरमध्ये साठवला जात आहेत. जुने आणि प्रलंबित फाईली शोधून काढण्यासाठी मंत्रालये आणि विभागांमध्ये विशेष मोहीमही राबवली जात आहे. हेही वाचा-'या' लोकांना देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय पुस्तकं वाचल्याने केवळ ज्ञानच मिळतं, असं नाही. यातून व्यक्तिमत्त्व घडतं आणि जीवनाला आकार येतो. पुस्तकं वाचण्याच्या छंदातून एक विलक्षण समाधान मिळतं. अलीकडच्या दिवसात अनेक लोक अभिमानाने सांगतात की, मी या वर्षात खूप पुस्तकं वाचली आहेत. यावर्षी मला ही पुस्तकं पुस्तकं वाचायची आहेत. हा एक चांगला ट्रेंड आहे, पण हा ट्रेंड आणखी वाढवला पाहिजे, असंही मोदी यांनी म्हटलं.
First published:

Tags: Mann ki baat, Narendra modi

पुढील बातम्या