नवी दिल्ली, 25 डिसेंबर : आपल्या वेगवेगळ्या विधानांमुळे आणि निर्णयामुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेसचे नेते आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत ( Nitin Raut) यांना काँग्रेस (congress) हायकमांडने धक्का दिला आहे. नितीन राऊत यांची काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरून गच्छती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांची निवड करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात वाद पेटला आहे. या अंतर्गत वादाचे पडसाद जाहीरपणे उमटायला लागले आहे. काँग्रेसच्या एससी विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या विभागाच्या अध्यक्षपदी राजेश लिलोठिया यांची निवड केली आहे. त्यामुळे नितीन राऊत यांना एससी विभागाचे अध्यक्षपद सोडावं लागलं आहे. नितीन राऊत काँग्रेस च्या एससी विभागाचे अध्यक्ष होते. सोनिया गांधी यांच्या आदेशावरून राऊत यांची गच्छती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
क्रूर हुकूमशहा किम जोंगच्या देशात पुरुषांसाठी 'सिक्रेट' हॉस्पिटल
काही दिवसांपूर्वीच दिल्ली हायकमांडने नागपूर विधान परिषद निवडणुकीच्या पराभवावरून नाना पटोले, नितीन राऊत आणि सुनील केदार यांना समन्स बजावला होता. या बैठकीमध्ये नागपूर निवडणुकीच्या पराभवावरून नितीन राऊत यांची झाडाझडती काढण्यात आली होती.
नागपुरात झालेल्या गोंधळाच्या मुद्यावर काँग्रेस हाय कमांडने समन्स दिला होता. या तिन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावण्यात आले होते. तिन्ही नेत्यांचा पायपोस एकमेकांत नसल्यामुळे खुलासा करण्यासाठी हे नेते दिल्लीत दाखल झाले होते. या तिन्ही नेत्यांनी या पराभवाबद्दल खुलासा करावा लागला होता. या निवडणुकीमध्ये सुरुवातीला काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर अपक्ष मंगेश देशमुख यांना कॉंग्रेसने समर्थन दिलं. पण मतमोजणी जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसमध्ये आयात केलेल्या या उमेदवाराला फक्त एक 1 मत मिळाले. तर चंद्रशेखर बावनकुळे यांना 362, मंगेश देशमुख यांना 186 व छोटू भोयर यांना 1 मत मिळाले. भाजपविरोधात काँग्रेसचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला आहे. त्यामुळेच आता दिल्लीत नेत्यांची झाडाघडती घेतली होती.
त्यानंतर या बैठकीनंतर नितीन राऊत प्रसारमाध्यमांशी काही न बोलता निघून गेले होते. त्यानंतर विधानसभेच्या अधिवेशनात सुद्धा नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात मतभेद चव्हाट्यावर आले होते. वीज बिलाच्या मुद्यावर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला होता. त्याला नाना पटोले यांनी दुजोरा दिला होता. त्यामुळे नाना पटोले आणि राऊत यांच्यातील वादाची किनार अधिवेशनातही पाहण्यास मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nitin raut