मराठी बातम्या /बातम्या /देश /धर्म नाही माणूस महत्त्वाचा; अयोध्येतील हिंदू बहुसंख्याक गावानं सरपंचपदासाठी निवडून दिला मुस्लीम उमेदवार

धर्म नाही माणूस महत्त्वाचा; अयोध्येतील हिंदू बहुसंख्याक गावानं सरपंचपदासाठी निवडून दिला मुस्लीम उमेदवार

अयोध्याच्या राजापूर गावातील लोकांनी त्यांच्या गावातल्या एकमेव मुस्लीम कुटुंबातील हाफिज अझीमुद्दीन (Hafiz Azeemuddin) यांना आपला प्रमुख म्हणून निवडून दिलं आहे. हाफिज या गावातून तब्बल 200 मतं मिळवून निवडून आले आहेत.

अयोध्या 11 मे: देशात हिंदू-मुस्लीम (Hindu-Muslim) यांचा मुद्दा घेत राजकारण करणारे अनेक नेते आहेत. मात्र, अयोध्यातील (Ayodhya) मतदारांनी लोकतंत्राचं अनोखं उदाहरण देशासमोर मांडलं आहे. अयोध्येतल्या हिंदू बहुल गावाने आपल्या भागातील एका मुसलमान उमेदवाराला (Muslim Candidate) गावाचा प्रमुख (Gram Pradhan) बनविले आहे. अयोध्याच्या राजापूर गावातील लोकांनी त्यांच्या गावातल्या एकमेव मुस्लीम कुटुंबातील हाफिज अझीमुद्दीन (Hafiz Azeemuddin) यांना आपला प्रमुख म्हणून निवडून दिलं आहे. हाफिज या गावातून तब्बल 200 मतं मिळवून निवडून आले आहेत. गावातील लोकांना त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत.

राजापूर या गावात केवळ एकूण 600 मतदारांपैकी केवळ 27 जण मुस्लीम आहेत. हे सर्व हाफिज यांच्या कुटुंबातील किंवा नात्यातीलच आहेत. हाफिज म्हणाले, की ही निवडणूक जिंकणं त्यांच्यासाठी ईदची भेट मिळाल्यासारखं आहे. त्यांचं म्हणणं आहे, की गावातील हिंदू मतदारांनीच त्यांनी निवडून दिलं आहे आणि आता त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणं माझं कर्तव्य आहे. व्यवसायाने हाफिज अझीमुद्दीन हे शेतकरी असून त्यांनी मदरशामधून अलीम आणि हाफिज या पदवी घेतल्या आहेत. ते दहा वर्षांपासून मदरशाचे शिक्षकही होते आणि आता ते आपल्या कुटुंबासह गावात शेती करतात.

600 मतदार असलेल्या या गावात हिंदू मतदारांच्या मतांनीच हाफिज यांना निवडून दिलं आहे. गावातील लोकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या या विश्वासासाठी अझीमुद्दीन यांनी लोकांचे आभार मानले आहेत. गावातील एक शेतकरी किसान शेखर साहू म्हणाले, की यावेळी लोकांनी धर्म नाही तर माणूस पाहून मतदान केलं आहे. हे खरं आहे, की आम्ही सगळे हिंदू धर्माला मानतो. मात्र, मुस्लीम उमेदवाराला निवडून देत हे दाखवून दिलं आहे, की आम्ही सर्व धर्मांचा सम्मान करतो.

अयोध्या मस्जिद ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी अझीमुद्दीन सांप्रदायिक बंधुत्वाचं उदाहरण असल्याचं म्हटलं. हुसैन म्हणाले, की अझीमुद्दीनचं जिंकणं हे सांगून जातं, की अनेक अडचणींनंतरही हिंदुस्तानमध्ये सर्व धर्मांमधील लोकांचं एकमेकांवरील प्रेम कायम आहे आणि हिच आपल्या देशाची खरी ताकत आहे.

First published:

Tags: Ayodhya, Election 2021, Muslim, Proud hindustani muslim