Home /News /national /

ऑर्डर घेण्यास उशीर केल्याने कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा; हॉकी स्टीकने मारहाण केली अन्...

ऑर्डर घेण्यास उशीर केल्याने कर्मचाऱ्याला भयंकर शिक्षा; हॉकी स्टीकने मारहाण केली अन्...

Crime News: ऑर्डर घेण्यास उशीर केल्याच्या (delay in taking order) कारणातून काही गुंडानी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्याला हॉकी स्टीकने बेदम मारहाण (Group of goon beat with hockey stick) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    गोरखपूर, 01 ऑक्टोबर: ऑर्डर घेण्यास उशीर केल्याच्या (delay in taking order) कारणातून काही गुंडानी वाईन शॉपमधील कर्मचाऱ्याला हॉकी स्टीकने बेदम मारहाण (Group of goon beat with hockey stick) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी केलेल्या अमानुष मारहाणीत संबंधित कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू (employee death)झाला आहे. ही संतापजनक घटना दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही व्हिडीओच्या (CCTV Video) आधारे अन्य आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. संबंधित घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील आहे. मनीष प्रजापती असं हत्या झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून तो गोरखपूर येथील मॉडेल शॉप नावाच्या वाईन शॉममध्ये काम करत होता. दरम्यान गुरुवारी रात्री उशीरा आलेल्या काही गुंडानी प्रजापती यांना बेदम मारहाण केली आहे. मृत प्रजापती यांनी आरोपींची ऑर्डर घेण्यास उशीर केल्याच्या कारणातून ही मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हेही वाचा-जिवंत राहण्यापेक्षा तू मेलेला परवडशील! पित्यानेच पोटच्या लेकराला नदीत फेकलं आरोपींनी डीएव्ही पदवी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी नेत्याचं नाव घेत, गुंडांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. आरोपींनी हॉकी स्टीकच्या साह्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मृत प्रजापती हे गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी दुकानातीन अन्य कर्मचाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण उपचारादरम्यान मनीष यांनी अखरेचा श्वास घेतला. किरकोळ कारणातून खुनाची गंभीर घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा-पुणे: पैसे उसने देणं जीवावर बेतलं; मित्रानेच जिवंत जाळून केली मदतीची परतफेड याप्रकरणी रामगढताल पोलीस ठाण्यांत आरोपींविरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती गोरखपूर पोलिसांनी आपल्या ट्विटर अकाऊंटमधून दिली आहे. तसेच, या धक्कादायक घटनेतील एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करू असं आश्वासन पोलिसांकडून दिलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Gang murder

    पुढील बातम्या