मराठी बातम्या /बातम्या /देश /बंगालमध्ये मतदानादिवशी TMC कार्यकर्त्याची हत्या, आतापर्यंत आठ जणांना अटक; सकाळपासून अनेकांवर हल्ले

बंगालमध्ये मतदानादिवशी TMC कार्यकर्त्याची हत्या, आतापर्यंत आठ जणांना अटक; सकाळपासून अनेकांवर हल्ले

केशपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या (Murder of Trinamool Congress Worker) झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

केशपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या (Murder of Trinamool Congress Worker) झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

केशपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या (Murder of Trinamool Congress Worker) झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे.

कोलकाता 01 मार्च : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election 2021) गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू झालं आहे. मात्र, मतदानाला सुरुवात होण्याआधीच केशपूरमध्ये तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याची हत्या (Murder of Trinamool Congress Worker) झाली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण आहे. तृणमूलचा असा आरोप आहे, की भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी हमला केल्यानंतर या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली आहे. परिसरातील तणावपूर्ण स्थिती पाहात मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी दुसऱ्या टप्प्यातील मतदाव सुरू होण्याआधीच हरिहरचाक परिसरात चाळीस वर्षीय उत्तम दोलाई या टीएमसी कार्यकर्त्याची हत्या झाल्याची माहिती समोर आली. टीएमसीनं असा आरोप केला, की काही दिवसांपूर्वी दोलाई आपल्या घरी जेवण करत असतानाच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांच्या पोटात चाकूनं वार केले होते. यानंतर दोलाई यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाला.

सकाळी मतदानाला सुरुवात झाल्यापासूनच राज्यात तणावाचं वातावरण आहे. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांवरही हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सकाळी केशपूरमध्ये भाजपच्या पोलिंग एजंटच्या गाडीवरही हल्ला झाला आहे. हल्ल्यादरम्यान गाडीच्या काचा फोडण्यात आल्या आहेत. भाजपनं असा आरोप केला आहे, की घटनेनंतरही पोलिसांनी तक्रार दाखल केलेली नाही. वेस्ट मिदनापूरमध्ये भाजपचे तन्मय घोष यांनी आरोप केला आहे, की त्यांच्या गाडीवर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. इतकंच नाही तर भाजपच्या महिला एजंटलाही मारहाण करण्यात आली आहे. तन्मय घोष यांनी आरोप केला आहे, की पोलीस त्यांची तक्रार घेण्यासही तयार नाहीत.

First published:

Tags: Crime news, Murder, TMC, Trinamool congress, West Bengal bjp, West Bengal Election