मराठी बातम्या /बातम्या /देश /West Bengal Election 2021: मतदानादिवशीच आढळला भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह, हत्या असल्याचा आरोप

West Bengal Election 2021: मतदानादिवशीच आढळला भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह, हत्या असल्याचा आरोप

राज्याच्या केशिययारी येथे एका भाजप कार्यकर्त्याची हत्या (Murder of BJP Worker) झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजप कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे.

कोलकाता 27 मार्च : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. 294 जागांपैकी 30 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदाता मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. बातमी देईपर्यंत राज्यात 14.28 टक्के मतदान झालं होतं. अशात आता अनेक ठिकाणांहून काही घटनांबद्दलच वृत्तही समोर येताना दिसत आहे.

राज्याच्या केशिययारी येथे एका भाजप कार्यकर्त्याची हत्या (Murder of BJP Worker) झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजप कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. भाजपचा असा दावा आहे, की या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. सांगितलं जात आहे, की रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला.

या घटनेबाबत बोलताना भाजप उमेदवार सोनाली मुर्मु म्हणाल्या, की सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला. ही अत्यंत दुःखद घटना असून प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सोबतच कार्यकर्त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून त्याच्या डोक्यालाही मार लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपचे बंगालचे अध्यक्ष दिलीर घोष म्हणाले, की माझ्यापर्यंत ही बातमी आली आहे, की हत्या झाली आहे. हे सर्व केवळ भीती पसरवण्यासाठी केलं जात आहे. मात्र, लोक याचं उत्तर नक्की देतील. जे भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक सहन करणार नाहीत.

First published:

Tags: BJP, Murder, West Bengal bjp, West Bengal Election