...तर नरेंद्र मोदी नाही BJPच्या दुसऱ्या नेत्याला मिळणार पंतप्रधानपदाची संधी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 04:44 PM IST

...तर नरेंद्र मोदी नाही BJPच्या दुसऱ्या नेत्याला मिळणार पंतप्रधानपदाची संधी?

मुंबई, 20 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी सोमवारी (20 मे) आरएसएस मुख्यालयाला भेट देणार आहेत. संघ मुख्यालयात पंतप्रधान मोदी मोहन भागवत यांच्यासोबत विविध मुद्यांवर चर्चा करतील, असं म्हटलं जात आहे. राजकीय क्षेत्रातील जाणकारांनुसार, लोकसभा निवडणूक 2019चे निकाल येण्याच्या बरोबर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी-सरसंघचालक भागवत यांच्यात होणारी ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

गेल्या चार वर्षांमध्ये पंतप्रधान मोदींची संघ मुख्यालयाला दिली जाणारी ही पहिलीच भेट आहे. 'न्यूज18 हिंदी'नं दिलेल्या वृत्तानुसार, NDAला पूर्ण बहुमत न मिळाल्यास अशा परिस्थितीत आरएसएसकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींऐवजी अन्य नेत्याच्या नावाचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकतो, अशी सध्या चर्चा आहे. याच कारणामुळे दोघांचीही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

वाचा :EXIT POLL 2019 : 'आएगा तो मोदीही' पण का वाटतेय 2004 ची भीती?

तर दुसरीकडे, पंतप्रधान मोदी सरसंघचालक भागवत यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि पंतप्रधानपदासाठी त्यांचे समर्थन मिळवण्यासाठी संघ मुख्यालयाला भेट देत आहेत, अशा दृष्टीकोनातूनही या भेटीकडे पाहिले जात आहे.

दरम्यान, नागपुरातील भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं की, 'भाजप पूर्ण बहुमतासहीत निवडणूक जिंकेल आणि केंद्रामध्ये एनडीएचं सरकार स्थापन होईल. पण बहुमत न मिळाल्यास अशा स्थितीत आरएसएस मोदींऐवजी अन्य दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान करतील, अशी शक्यता आहे.'

Loading...

त्यामुळे आता नरेंद्र मोदींच्या गळ्यात पुन्हा पंतप्रधानपदाची माळ पडणार की भाजपला बहुमताचा जादुई आकडा गाठता न आल्यास भाजपच्या दुसऱ्या नेत्याला पंतप्रधानपदी विराजमान होण्याची संधी मिळणार? हे सारं काही 23 मे रोजी लागणाऱ्या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून आहे.

वाचा : एक्झिट पोलनंतर नागपुरात हालचालींना वेग, RSS चे मोठे नेते गडकरींच्या भेटीला

लोकसभा निवडणूक 2019 ची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर रविवारी (20 मे) एक्झिट पोलचे आकडे समोर आले. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. भाजपचे केंद्रीय महासचिव आणि पश्चिम बंगालचे पक्षाचे प्रभारी कैलास विजय वर्गीय हे सुद्धा भैय्याजी जोशी यांच्यासोबत नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी गेले होते. या नेत्यांमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आगामी काळात इतर काही नवीन समीकरणं समोर येतात का? याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...