EXIT POLL 2019 : 'आएगा तो मोदीही' पण का वाटतेय 2004 ची भीती?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच अंशी खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचं सरकार बनेल, असं या सर्व्हेमध्ये म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा हे एक्झिट पोल खरे ठरणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 20, 2019 04:22 PM IST

EXIT POLL 2019 : 'आएगा तो मोदीही' पण का वाटतेय 2004 ची भीती?

मुंबई, 21 मे : 2014 च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज बऱ्याच अंशी खरे ठरले. भाजपच्या नेतृत्वाखाली देशात एनडीएचं सरकार बनेल, असं या सर्व्हेमध्ये म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा हे एक्झिट पोल खरे ठरणार का याची चर्चा सुरू झाली आहे.

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर जे सर्व्हे झाले त्यानुसारचे हे आकडे आहेत. यावरून एकूण देशाचा मूड काय याचा अंदाज घ्यायला मदत होते. पण एक्झिट पोलचे आकडे आणि निकालानंतरचे आकडे यामध्ये फरक असू शकतो. काही एक्झिट पोलमध्ये मतदारांचा कौल जाणून घेण्यात अपयश आल्याचीही उदाहरणं आहेत.

गेल्या निवडणुकीत खरे ठरले एक्झिट पोल

मागच्या लोकसभा निवडणुकीत जाहीर झालेले एक्झिट पोल पाहिले तर यामध्ये व्यक्त केलेले अंदाज खरे ठरले. जेव्हा निकाल आले तेव्हा भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आणि एनडीए 336 जागा मिळवून विजयी झालं. काँग्रेसला फक्त 44 जागा मिळाल्या.

एवढा होता फरक

Loading...

2014 च्या निवडणुकीत NDA ला 336 जागा मिळाल्या. भाजपला 282 जागा मिळाल्या. UPA ला 59 आणि काँग्रेसला 44 जागांवर समाधान मानावं लागलं.

हे सगळे सर्व्हे बघितले तर आपल्याला निकाल आणि एक्झिट पोलमध्ये किती फरक होता याचा अंदाज येईल.

न्यूज 24 चाणक्यने NDA ला 340 जागा मिळतील, असा अंदाज दिला होता. निकालामध्ये NDA ला 336 जागा मिळाल्या. याचा अर्थ या सर्व्हेपेक्षा NDA ला फक्त चार जागा कमी मिळाल्या.

टाइम्स नाउ ने NDA ला 249 आणि UPA ला 148 जागा दिल्या होत्या. टाइम्स नाउ ने NDA ला 87 जागा कमी दाखवल्या होत्या.

इंडिया टीव्ही ने NDA ला 289 जागा दाखवल्या होत्या. प्रत्यक्ष निकालापेक्षा त्या 47 ने कमी होत्या.

इंडिया टुडे ने NDA ला 272 जागा दिल्या होत्या. या प्रत्यक्ष निकालापेक्षा 64 ने कमी होत्या.

नेल्सन - एबीपी ने NDA ला 274 जागा दिल्या. या निकालापेक्षा 69 ने कमी होत्या.

2014 चे एक्झिट पोलमने वर्तवलेले अंदाज बहुतांशी खरे ठरे पण याआधी 2004 मध्ये आणि 2009 च्या निवडणुकांचे अंदाज मतदारांचा कौल जाणून घेण्यात अपयशी ठरले. एक्झिट पोलचे अंदाज पूर्णपणे चुकले ते 2004 मध्ये.

2004 मध्ये काय झालं ?

2004 साली बहुतांश एक्झिट पोलमध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचं एनडीए सरकार येईल, अशी भविष्यवाणी झाली होती. पण त्यावेळी NDA ला 189 जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA ला 222 जागा मिळाल्या. यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान झाले.

यानंतर 2009 मध्येही एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे ठरले. यामध्ये यूपीएचा विजय होईल असे अंदाज होते पण काँग्रेसला 200 जागा मिळतील, असं कुणी म्हटलं नव्हतं. प्रत्यक्षात मात्र काँग्रेसला 206 जागा मिळाल्या तर यूपीएला 262 जागा मिळाल्या.

यावेळी लोकसभा निवडणुकीत NDA ला बहुमत मिळेल आणि पुन्हा एकदा मोदी सरकारच येईल, असा अंदाज आहे. आता या एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात किती फरक पडतो हे पाहावं लागेल.

================================================================================

EXCLUSIVE: 'नवनीत राणा नही आँधी हैं, दूसरी इंदिरा गांधी हैं...' पाहा UNCUT मुलाखत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 04:22 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...