मराठी बातम्या /बातम्या /देश /

मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचं इंडियन मुजाहिद्दीन कनेक्शन! टेलिग्राम चॅनलच्या लोकेशनमुळे मोठा ट्विस्ट

मुंबईत स्फोटकांनी भरलेल्या गाडीचं इंडियन मुजाहिद्दीन कनेक्शन! टेलिग्राम चॅनलच्या लोकेशनमुळे मोठा ट्विस्ट

मुंबईतल्या (Mumbai) दक्षिण मुंबई इथं स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Mahindra Scorpio) प्रकरणाचे इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले आहे

मुंबईतल्या (Mumbai) दक्षिण मुंबई इथं स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Mahindra Scorpio) प्रकरणाचे इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले आहे

मुंबईतल्या (Mumbai) दक्षिण मुंबई इथं स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Mahindra Scorpio) प्रकरणाचे इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले आहे

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 12 मार्च :  मुंबईतल्या (Mumbai) दक्षिण मुंबई इथं स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी (Mahindra Scorpio) प्रकरणाचे इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले आहे. या कारमध्ये सापडलेले धमकीचे पत्र ज्या टेलिग्राम चॅनलवरुन देण्यात आले होते, ते टेलिग्राम चॅनल (Telegram channel) दिल्लीतील तिहार कारागृहात (Tihar Jail) तयार करण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती मिळाली आहे. तिहार जेल प्रशासाने तो फोन जप्त केला असून तो शुक्रवारी या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्पेशल सेलकडे सोपण्यात येणार आहे.

इंडियन मुजाहिद्दीनशी कनेक्शन

तिहार जेलमध्ये कैद असलेला इंडियन मुजाहिद्दीनचा (Indian Mujahedeen) कट्टर दहशतवादी तहसीन अख्तर (Tahsin Akhtar) याच्या कोठडीतून एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. याच मोबाईलमधून धमकीचा मेसेज तयार करण्यात आला होता, अशी माहिती आहे. या मोबाईलमधून एक व्हर्च्यूअल मोबाईल नंबर तयार करण्यात आला  होता. त्या नंबरवरुन आधी टेलिग्राम अकाऊंट तयार करण्यात आले आणि नंतर त्यामधून धमकीचे पोस्टर बनवण्यात आले अशी माहिती तपासामध्ये समोर आली आहे.

तिहार जेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी 6 ते रात्री 9 दरम्यान स्पेशल सेलच्या टीमने कारवाई केली. या कारवाईत जेलनंबर 8 मधून हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात आणखी एक नंबर तपास पथकाच्या रडारवर आहे. हा नंबर सप्टेंबरमध्ये सक्रीय झाला होता. त्यानंतर तो बंद करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे तहसीन अख्तर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पटनामधील गांधी मैदान इथं झालेल्या सभेतील बॉम्बस्फोट, हैदराबाद आणि बुद्ध गयामधील बॉम्बस्फोटात तहसीनचा सहभाग होता.त्याला 2013 साली हैदराबादमध्ये झालेल्या  बॉम्बस्फोटात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. याच प्रकरणात इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी यासिन भटकलला देखील फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

तहसीनला तिहार जेलमधून दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे पाठवण्यात येणार आहे. तहसनीच्या चौकशीत या प्रकरणातील नवी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

( वाचा : व्यापाऱ्याने थेट हॉटेलमध्येच गळफास घेऊन केली आत्महत्या, धक्कादायक कारण समोर )

दरम्यान, एनआयएला (NIA) या प्रकरणात  मोठे यश मिळाले आहे. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी पार्क करून पांढरा रंगांच्या इनोव्हा गाडीतून दोन संशयित फरार झाले होते. त्या इनोव्हा गाडी (Innova car) संदर्भात एनआयएच्या टीमच्या हाती  मोठी माहिती हाती लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडी बाबत मोठा खुलासा करणार असल्याचं सांगितलं जातं आहे.

First published:

Tags: Bomb Blast, Breaking News, Crime, Explosives, Mumbai, Tihar jail