नवी दिल्ली, 16 सप्टेंबर: येणाऱ्या T20 वर्ल्डकपमध्ये
(T20 World Cup) भारतिचे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी
(MS Dhoni) याच्यावर एक विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाला मार्गदर्शन करताना आत धोनी दिसणार आहे. यामुळे त्याचे चाहते खूश झाले आहेत. मात्र आता कॅप्टन कूलवर भारताच्या संरक्षण मंत्रालयाकडूनही
(Ministry of Defence) एक मोठी जबाबदारी सोपण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयानं
National Cadet Corps (NCC) संदर्भात स्थापन केलेल्या 15 सदस्यीय समितीमध्ये धोनीचाही समावेश केला आहे. यासंबंधीचं वृत्त
'हिंदुस्थान' नं प्रकाशित केलं आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून ही समिती बनवण्यात आली आहे. NCC ला अधिक सक्षम आणि समर्पक बनवण्यासाठी ही समिती गठीत करण्यात आली आहे. संरक्षण मंत्रालयानं स्थापन केलेल्या या समितीमध्ये महेंद्र सिंग धोनी, महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा
(Anand Mahindra), कर्नल (निवृत्त) राज्यवर्धन सिंह राठोड, राज्यसभा सदस्य विनय सहस्रबुद्धे, अर्थ मंत्रालयातील प्रधान आर्थिक सल्लागार संजीव सन्याल आणि जामिया मिलिया इस्लामियाचे कुलगुरू नजमा यांचा समावेश आहे.
हे वाचा -
नशीब म्हणायचं की चमत्कार? डोक्यावरून ट्रॅक्टर जाऊनही वाचला जीव, पाहा VIDEO
तसंच एसएनडीटी महिला विश्वविद्यालयाच्या माजी कुलगुरू वसुधा कामत, भारतीय शिक्षण मंडळाचे राष्ट्रीय संघटन सचिव मुकुल कानिटकर, मेजर जनरल (निवृत्त) आलोक राज, एसआयएस इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ऋतुराज सिन्हा आणि डेटाबुकचे सीईओ आनंद शाह यांची नावे देण्यात आली आहेत. त्याचबरोबर माजी आमदार बैजयंत पांडा यांना समितीचे अध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आलं आहे.
NCC ही खाकी युनिफॉर्ममधील सर्वात मोठी संस्था आहे ज्याचा हेतू तरुण नागरिकांमध्ये चारित्र्य, शिस्त, एक धर्मनिरपेक्ष दृष्टीकोन आणि निःस्वार्थ सेवेचा आदर्श रुजवणं आहे त्यामुळे या NSS ला अधिक सक्षम आणि समर्पक बनवण्यासाठी ही समिती काम करेल. तसंच ही समिती NCC ला व्यापक रूप देण्यातही काम करणार आहे.
हे वाचा -
Delhi-Mumbai Expressway: दिल्लीवारी होणार सुस्साट; 12 तासांत दिल्ली-मुंबई प्रवास
एकूणच काय तर आता कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीवर वर्ल्ड कपसोबतच भारताच्या NCC ला सक्षम बनवण्याचीही मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही जबाबदारी धोनी उत्तमपणे पार पडेल असा विश्वास सर्वांनाच आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.