नवी दिल्ली, 16 सप्टेंबर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी गुरुवारी (16 सप्टेंबर) दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या (Delhi-Mumbai Express Way) कामाची पाहणी केली. हा एक्स्प्रेस वे येत्या दोन वर्षांत सुरू होईल आणि दिल्ली ते कटरा (Delhi-Katra) हा प्रवास केवळ सहा तासांत पूर्ण होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच हा मार्ग तयार झाल्यावर दिल्ली मुंबई प्रवास अवघ्या 12 तासांत पूर्ण करता येणार आहे. अन्य काही महामार्ग आणि रस्त्यांबद्दलची माहितीही त्यांनी यावेळी दिल्ली. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टरही (Manoharlal Khattar) त्या वेळी त्यांच्यासोबत होते. त्यानंतर गडकरी राजस्थानात पोहोचले. तिथे गेल्यावर दौसा इथे त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली. हा एक्स्प्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात या राज्यांतून महाराष्ट्रात येणार आहे. दौसामध्ये (Dausa) पत्रकारांशी बोलताना गडकरी यांनी सांगितलं, ‘2023-24पर्यंत 30 हजार कोटी रुपये खर्च करून सुमारे 2500 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या योजना राजस्थानमध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आम्ही ठेवलं आहे.’ ‘दिल्ली-कटरा एक्स्प्रेस वे दोन वर्षांत पूर्ण होईल. त्यामुळे या दोन ठिकाणांतलं अंतर 727 किलोमीटर्सवरून 572 किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे दिल्लीतून कटराला सहा तासांमध्ये पोहोचता येणार आहे. तसंच, हे अंतर दोन तासांवर येण्यासाठी दिल्ली-चंडीगड, दिल्ली-डेहराडून आणि दिल्ली-हरिद्वार अशा काही नव्या रस्त्यांवरही काम करतो आहोत,’ असं गडकरींनी हरियाणात सोहना येथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं. आनंदाची बातमी! कर्मचाऱ्यांना आता आठवड्यातून 3 दिवस मिळणार सुट्टी; लागू होणार नवे नियम देशात नवी हॉर्न सिस्टीम (New Horn System) लागू करण्याबद्दलही गडकरी यांनी माहिती दिली. त्यामुळे आता कर्णकर्कश आवाजाच्या हॉर्नपासून मुक्ती मिळणार असून, बासरी, सारंगी आदींच्या आवाजातल्या हॉर्नचा वापर केला जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमाआधी नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबद्दल माहिती देणारं एक ट्विट केलं होतं. ‘दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या दोन दिवसांच्या पाहणी कार्यक्रमांतर्गत आज हरियाणात सोहना येथे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आणि केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजितसिंह यांच्यासह एक्स्प्रेस वेची पाहणी केली. या योजनेअंतर्गत हरियाणामध्ये एकूण 160 किलोमीटर लांबीच्या रस्त्याची निर्मिती होणार असून, त्यापैकी 130 किलोमीटरचं काम देऊन झालं आहे. हरियाणा राज्याला राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राशी जोडून हा एक्स्प्रेस वे राज्यात आर्थिक समृद्धी आणि विकास घेऊन येईल,’ असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं होतं. दुहेरी संकट! कोरोनासोबत डेंग्यूचाही कहर, देशात 100 पेक्षा जास्त मुलांचा मृत्यू परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, या एक्स्प्रेसवेसाठी 98 हजार कोटी रुपये खर्च केले जात आहेत. दिल्ली-मुंबई हा 1380 किलोमीटर लांबीचा एक्स्प्रेस वे देशातला सर्वांत जास्त अंतराचा एक्स्प्रेसवे ठरेल. नावाप्रमाणेच हा एक्स्प्रेसवे दिल्ली आणि मुंबई या शहरांची कनेक्टिव्हिटी सुधारेल. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांतून हा महामार्ग मुंबईत येईल. त्यामुळे जयपूर, किशनगड, अजमेर, कोटा, चितोडगड, उदयपूर, भोपाळ, उज्जैन, इंदूर, अहमदाबाद, बडोदा, सुरत असे इकॉनॉमिक हब्स एकमेकांशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘न्यू इंडिया व्हिजन’ (New Indian Vision) अंतर्गत दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेच्या कामाची सुरुवात 2018 साली झाली होती. 9 मार्च 2019 रोजी या कामाचं भूमिपूजन झालं होतं. 1380 किलोमीटरपैकी 1200 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या कामाचं काँट्रॅक्ट आधीच देण्यात आलं असून, निर्मितीचं काम वेगानं सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.