भोपाळ, 30 जुलै: एका 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन, तिला ब्लॅकमेल करत तिच्याकडून कोट्यवधी रुपये उकळल्याची घटना मध्य प्रदेशातील (MP girl rape and blackmail) जावरामध्ये समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पीडितेच्या भावाने काही पैसे काढण्यासाठी जेव्हा तिजोरी उघडली, तेव्हा तिथले पैसे गायब झाल्याचं त्याच्या लक्षात आले. यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे या घटनेतील आरोपी पीडितेचा मित्रच (MP girl raped by friend) आहे. दैनिक भास्करने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी इंदूरमध्ये एमबीएचे शिक्षण घेत असताना पीडितेची आरोपीशी ओळख झाली. निशित उर्फ मयूर बाफना असं नाव असलेला हा तरुण पीडितेच्या घरापासून 15 किलोमीटर दूर असणाऱ्या बडावदा गावात राहत होता. त्यामुळे त्यांची लवकरच चांगली ओळख झाली. 2019च्या मार्चमध्ये ही तरुणी घरी आली होती. तेव्हाच आरोपी निशितही तिच्या घरी आला, आणि तिला शीतपेयामधून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार (MBA student raped at home) केला. यावेळी त्याने तिचे अक्षेपार्ह फोटोही घेतले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पुढे निशित तिच्याकडून पैसे उकळत राहिला.
दोन वर्षांमध्ये आरोपीने ब्लॅकमेल करून पीडितेकडून (Blackmailer took crores from victim) तब्बल एक कोटी 35 लाख रुपये रोख, सुमारे दीड कोटी रुपये किंमतीचे साडेतीन किलो सोने आणि सुमारे 10.20 लाख रुपये किंमतीची 15 किलो चांदी एवढे साहित्य घेतले. पीडितेने फोन-पे, ऑनलाईन बँकिंग आणि इतर माध्यमांतून आरोपीच्या अॅक्सिस आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यांमध्ये पैसे जमा केले होते.
Mumbai: आधी कचऱ्यात बसवलं मग सडलेलं अन्न खायला पाडलं भाग; क्रूरतेच्या परिसीमा गाठणारा VIDEO आला समोर
यावर्षी 15 जुलै रोजी पीडितेच्या भावाने 50 लाख रुपये काढण्यासाठी तिजोरी उघडली होती. मात्र, तिजोरीतील रक्कम कमी असल्याचे दिसल्यानंतर त्याने चोरीची तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पीडितेने आपण पैसे घेतल्याचे सांगितले. मात्र हे पैसे दुप्पट करण्यासाठी एका मांत्रिकाला दिल्याचे तिने घरच्यांना सांगितले. तिने मांत्रिकाचे नाव सांगून आपल्या घरच्यांचे निशितशी फोनवर बोलणेही करुन दिले. दोन-तीन दिवसांनंतर पुन्हा घरच्यांनी पैसे आणि दागिन्यांबाबत विचारणा केली असता पीडितेने पैसे दुप्पट झाल्याचं सांगितले. यासोबतच तिने आपण हे दुप्पट झालेले पैसे तिजोरीत ठेवल्याचे सांगितले. मात्र तिजोरी उघडून पाहिल्यानंतर पैसे दिसले नाहीत तेव्हा घरच्यांनी तिला खडसावले. यानंतर पीडितेने सगळा प्रकार सांगितला.
माणुसकीला काळिमा! नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला, CCTV फुटेजमुळे खुलासा
पीडितेच्या घरच्यांनी यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्याचे प्रमुख जोशी यांनी सांगितले, की निशित उर्फ मयूर बाफना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचा शोध सुरू आहे. याबाबत बँक रेकॉर्ड्स आणि इतर गोष्टींची तपासणी सुरू आहे. यामध्ये निशित सोबत आणखी कोणी सामील असल्याचे समजल्यास त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Rape, Rape case, Rape news