मुंबई, 30 जुलै: मुंबईतील जोगेश्वरी परिसरातून एक संताजनक घटना समोर आली आहे. काही जणांनी एका तरुणाला चक्क कचऱ्यात बसवून त्याला कचऱ्यातील सडलेलं अन्न खायला भाग पाडलं आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर त्यांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतं आहे. आरोपीनं वैयक्तिक दुष्मनीतून हे संतापजनक कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हा व्हिडीओ समोर आल्यानंतर जोगेश्वरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करत असताना, पोलिसांनी एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. अद्याप एक आरोपी फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
हेही वाचा-चार महिन्यांपासून सुरू होता गैरप्रकार; कंटाळून नगरमधील 2 बहिणींनी केलं विषप्राशन
संबंधित घटना ही 21 जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडीओत काही तरुण एका पीडित तरुणाला दमदाटी करत कचऱ्यात बसवलं आहे. आरोपी एवढ्यावरचं थांबले नाहीत. तर त्यांनी कचऱ्यातील दुर्गंधी सुटलेले, सडलेले पदार्थ तरुणाला खाऊ घातले आहेत. अमानुषतेचा कळस म्हणजे आरोपींनी त्याला त्या कचऱ्यात झोपण्यासही भाग पाडलं आहे. दुसरीकडे पीडित तरुणी हात जोडून आरोपीला असं न करण्याची विनवणी करत आहे.
हेही वाचा-नर्सकडून 2 महिन्यांच्या बाळाला अमानुष मारहाण; हातही मोडला, CCTV फुटेजमुळे खुलासा
पण आरोपींनी जराही दया न दाखवता, त्याला अशी अमानुष शिक्षा दिली आहे. पीडित तरुणाच्या आकांतानं असे अत्याचार न करण्याची विनंती करत होता. पण आरोपींनी अत्याचार सुरूच ठेवला. आरोपींनी नेमक्या कोणत्या कारणातून हे संतापजनक कृत्य केलं आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Shocking viral video