जाहिरात
मराठी बातम्या / देश / 'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक VIDEO आला समोर

'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक VIDEO आला समोर

'मी जिवंत आहे', डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या कोरोना रुग्णाचा धक्कादायक VIDEO आला समोर

डॉक्टरांनी केलं मृत घोषित, दोन दिवसांनी त्याच रुग्णांचा जिवंत असल्याचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल झाला.

  • -MIN READ
  • Last Updated :

उज्जैन, 27 एप्रिल : भारतात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. कोरोनामुळं मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाकडून एक मोठी चूक झाली आहे. आरोग्य विभागातील एका डॉक्टरांनी जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केले. यासंबंधी अशी चूक करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. भोपाळपासून 190 किमी दूर असलेल्या उज्जैनमध्ये हा सगळा प्रकार घडला. ज्या रुग्णाला मृत घोषित करण्यात आले, त्याच 30 वर्षीय रूग्णाने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. यात त्यानं, मी जिवंत असल्याचे म्हंटले आहे. या पोस्ट केलेल्या व्हिडीओ क्लिपनंतर  आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओ क्लिपमध्ये रुग्ण असे म्हणत आहे की, “मला दोन दिवसांपूर्वी आरडी गर्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मी शनिवारी एका वृत्तपत्रात वाचले की मला मृत घोषित करण्यात आले आहे. पण मी जिवंत आणि निरोगी आहे. कृपया हा व्हिडीओ इतरांसोबत शेअर करावा". हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. वाचा- लॉकडाऊन हटवण्याआधी करा ‘ही’ तयारी, WHOने सर्व देशांना दिल्या सूचना

जाहिरात

वाचा- हॉटस्पॉट झालेल्या मुंबईत महापौर सरसावल्या, किशोरी पेडणेकर दिसणार नव्या अवतारात रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय व आरोग्य अधिकारी (CMHO), डॉ. अनुसुइया गवळी सिन्हा यांनी, “या व्यक्तीने नाव रुग्णालयातील 60 वर्षीय मृत व्यक्तीच्या नावावर चुकून नोंद झाली आहे. नोडल ऑफिसर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले की नावं व पत्त्यावरुन हा गोंधळ झाला”. CMHOने संबंधित डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच, त्यांना इशाराही देण्यात आला आहे. वाचा- कोरोनाविरोधातील लढाई आता आणखी अवघड, लसीबाबत ब्रिटनमधून आली मोठी बातमी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मध्य प्रदेशात रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2096वर पोहोचली आहे. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार राज्यात या आजाराने 99 लोकांचा मृत्यू झासा आहे. यातील एकट्या इंदूरमध्ये 57 मृत्यूची नोंद झाली आहे. संपादन, संकलन-प्रियांका गावडे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात