मुंबई, 27 एप्रिल : किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर आता एका नव्या अवतारात दिसणार आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी महापौर किशोरी पेडणेकर आता नर्स बनणार आहेत. सध्या किशोरी पेडणेकर या मुंबईच्या प्रथम नागरिक म्हणून काम करत असल्या तरीही पूर्वी त्या परिचारिका होत्या. 1991 त्यांनी नोकरी सोडली आणि त्या राजकारणात आल्या. प रिचारिका म्हणून काम करत असतानाही शिवसेनेच्या महिला शाखेमध्ये त्यांनी अनेक महत्वपूर्ण भूमिका बजावल्या होत्या. म्हणूनच 1991 पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आणि त्यांनी मुंबई महापालिकेच्या राजकारणात प्रवेश केला. सध्या किशोरी पेडणेकर या चौथ्यांदा नगरसेविका झाल्या असून गेले काही महिने त्या मुंबईच्या महापौर म्हणून काम करत आहेत कोरोनाच्या अशा परिस्थितीतही त्यांनी अनेक रुग्णालयांना भेटी दिल्या आणि त्यातल्या कर्मचाऱ्यांच्या येणाऱ्या रुग्णांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. याच कामादरम्यान त्या अनेक पत्रकारांशी आणि रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांशी, सामाजिक संस्थांशी संपर्कात आल्या होत्या. हा संपर्क फिजिकल डिस्टन्स ठेवून करण्यात आला असला तरीही महापौरांनी त्यांची कोरोना चाचणी करून घेतली. या चाचणीचा निकाल येइपर्यंत त्यांनी स्वतःला महापौर बंगल्यात विलगीकरण करून घेतले होते. आता या विलगीकरणातून बाहेर येत असताना त्यांनी आपला जुनाच पण तरीही नव्याने धारण केलेला अवतार घ्यायचे ठरवले आहे. त्या मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील परिचारिकांची संवाद साधणार आहेत. हा संवाद साधत असताना परिचारिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. सोबतच परिचारिकांना वाटणारी भीती कमी करण्यासाठी त्या मार्गदर्शनही करणार आहेत. हेही वाचा - सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा, फटाक्याच्या धुरातून रुग्णाला चालतच आणलं घरी मुंबईच्या महापौर आणि जुन्या परिचारिका अशा दुहेरी भूमिकांतून त्या हा संवाद साधणार आहेत. कोरोनाशी लढा देत असताना अनेक आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स नर्स वॉर्डबॉय यांना कोरोनाची लागण होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाला आहे. अशाच लोकांना एक भावनिक आधार देण्यासाठी मुंबईच्या महापौर सरसावल्या आहेत. सोमवारी मुंबईच्या नायर रुग्णालयात आणि त्यानंतर मंगळवारी सायन रुग्णालयात त्या हा संवाद साधणार आहेत. संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.