Home /News /national /

कोरोनासाठी स्पीड ब्रेकर ठरलं लॉकडाऊन, वाचा आधी आणि नंतर काय झालं?

कोरोनासाठी स्पीड ब्रेकर ठरलं लॉकडाऊन, वाचा आधी आणि नंतर काय झालं?

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

देशात सुरुवातीला 21 दिवसांसाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर पुन्हा वाढवलं. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.

    नवी दिल्ली, 17 एप्रिल : जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी भारतात लॉकडाऊन कऱण्यात आलं आहे. देशात सुरुवातीला 21 दिवसांसाठी करण्यात आलेलं लॉकडाऊन 14 एप्रिलनंतर पुन्हा वाढवलं. याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाचं प्रमाण कमी झालं आहे. लॉकडाऊनच्या आधी कोरोनाचा प्रादुर्भाव 3 दिवसात दुप्पट होत असे. मात्र आता हेच प्रमाण 6.2 दिवसांपर्यंत गेलं आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचं प्रमाणापेक्षाही 19 राज्यांचे प्रमाण कमी आहे. या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दुप्पट होण्यास सहा ते सात दिवसांपेक्षा अधिक कालावधी लागत आहे. यामध्ये केरळने कोरोनावर नियंत्रण मिळवलं असून इथल्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाणही आटोक्यात आहे. केरळ, उत्तराखंड, हरियाणा, लडाख, हिमाचल, चंदिगढ, पाँडिचेरी, बिहार, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडु, आंध्र प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, जम्मू काश्मीर, पंजाब, आसाम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश आहे. भारतात कोरोनाचा प्रसार होत असला तरी, काही राज्यांत मृत्यू दर कमी झाला आहे. गेल्या 24 तासांत पहिल्यांदाच 260 लोक ठणठणीत बरे होऊन घरी परतले. यामुळे एकाच दिवशी निरोगी होण्याचा दर 13 टक्क्यांनी वाढला. आतापर्यंत भारतात 1,748 रुग्ण बरे झाले आहेत. तर, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 13 हजार 387 वर पोहचली आहे. भारतात कोरोनामुळे मृतांचा आकडा 437 इतका झाला आहे. हे वाचा : भारताला सगळ्यात मोठं यश, 24 तासांत 260 रुग्णांनी कोरोनावर केली मात राजस्थान, पंजाब आणि बिहार या राज्यांनी वेळीच खबरदारी घेत लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांची संख्या झपाट्याने घटली आहे. आरोग्य मंत्रालयाशी संबंधित एका अधिकाऱ्यांने सांगितले की, पुढचा आठवडा फार महत्वाचा ठरणार आहे. कोरोना संशयितांची आता वेगाने चाचणी घेण्यात येत आहे. श्वास घेण्यात त्रास होत असलेल्या अशा सर्व लोकांची चाचणी घेण्यात येत आहे. हे वाचा : मेच्या पहिल्या आठवड्यात मिळणार चांगली बातमी, गृह मंत्रालयाने दिले संकेत संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या