जयपूर, 17 एप्रिल : राजस्थानमधील चित्तोडगढ इथं उपविभागीय अधिकारी पदी कार्यरत असलेल्या आयएएस महिला अधिकाऱ्याची बदली करण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या तडकाफडकी बदलीची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. तेजस्वी राणा असं नाव असलेल्या या महिला आयएएसने लॉकडाऊनचं उल्लंघन करणाऱ्या काँग्रेस आमदाराच्या कार्यकर्त्यावर कारवाई केली होती. त्याच्या गाडीची पावतीही फाडली होती. हा सर्व प्रकार घडला त्यावेळी आमदारही गाडीत होते. दरम्यान, तेजस्वी राणा यांच्या बदलीवरून आता केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी राजस्थान सरकारवर टीका केली आहे. चांगलं काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप भाज प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी केला.
केंद्रीय मंत्री शेखावत म्हणाले की, राज्यात कोरोनाला लढा देण्यासाठी अधिकारी मोठ्या प्रमाणावर कष्ट करत आहेत. पण चित्तोडगड इथं लॉकडाऊनची अंमलबजावणी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांवर राजकीय कारणांमुळे केली जाणारी कारवाई दुर्दैवी आहे. बदलीबाबत राज्य सरकारकडून सांगण्यात येणारं कारण वेगळं असलं तरी आमदाराच्या कार्यकर्त्याची पावती फाडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना झाली. यातून राज्यातील इतर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो असंही शेखावत म्हणाले.
राजस्थानमध्ये चित्तोडगढ इथं तेजस्वी राणा उउपविभागीय अधिकारी पदावर कार्यरत होत्या. आता त्यांची बदली संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेल्थ इन्शुरन्स एजन्सी पदावर करण्यात आली आहे. त्याआधी मंगळवारी तेजस्वी राणा यांनी बेंगू इथले आमदार राजेंद्र सिंग विधूडी यांच्या कार्यकर्त्यावर कारवाईचा बडगा उगारला होता. त्यावेळी आमदारही गाडीत होते अशी माहिती मिळते. तेजस्वी राणा यांनी संबंधित कार्यकर्त्याच्या गाडीची पावतीही फाडली.
हे वाचा : धारावीत उद्रेक: 12 तासांमध्ये मिळाले 15 कोरोना रुग्ण, संख्या 101वर
दरम्यान, त्याच दिवशी तेजस्वी राणा या भाजी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांवर भडकल्या होत्या. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नसल्याच्या मुद्यावरून त्यांनी व्यापाऱ्यांना धारेवर धरलं होतं. त्यावेळी व्यापाऱ्यांनी दाखवलेले पास तेजस्वी राणा यांनी फाडले होते तसंच तिथल्या टेबल खुर्च्याही फेकल्याचे आरोप त्यांच्यावर कऱण्यात येत होते. या कारणामुळेच तेजस्वी राणा यांची बदली झाल्याचं म्हटलं जात आहे.
हे वाचा :
गर्भवती महिलेला मिळाली नाही Ambulance, पोलिस जीपमध्ये दिला मुलाला जन्म मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.