कन्नूर, 19 फेब्रुवारी : केरळमधील कन्नूर या भागातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. ही बातमी वाचल्यावर अनेकांना यावर विश्वास बसणार नाही. एका 21 वर्षीय महिलेने आपल्या दीड वर्षांच्या मुलाची निघृण पद्धतीने हत्या केल्याची बाब समोर आली आहे. वियान असं त्या मुलाचं नाव आहे. मुलाची हत्या केल्याच्या आरोपाखाली या महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगळवारी या दीड वर्षांच्या कोवळा बाळाचा मृतदेह समुद्राकिनाऱ्याजवळ सापडला. महिलेने या बाळाची हत्या करण्यासाठी त्याला समुद्रात फेकून दिल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेचं नाव सरन्या असे आहे. सरन्या पती प्रणवसोबत पटत नसल्याने स्वतंत्र राहत होती. त्या दिवशी सरन्याचा पती मुलाला भेटण्यासाठी आला होता. दुसऱ्या दिवशी तो पाहतो तर मुलं जागेवर नव्हतं. यानंतर त्याने पोलिसांकडे याबाबत तक्रार केली. सुरुवातीच्या तपासादरम्यान सरन्या आणि तिचे पती वेगवेगळी साक्ष देत होते. त्यानंतर मात्र पोलिसांनी दोघांची स्वतंत्रपणे विचारपूस केली. तपास अधिकारीने इंडिया टुडे या वृत्तमाध्यमांना सांगितले, की सरन्याचा पती तब्बल तीन महिन्यांनंतर मुलाला भेटायला आला होता. तक्रारीत तो म्हणाला मुल त्याच्या आईसोबत झोपले होते. तर सरन्याचं म्हणणं होतं की मुल त्याच्या वडिलांसोबत होतं. दोघांनी दिलेल्या वेगवेगळ्या विधानामुळे संशय निर्माण झाला. यानंतर मात्र पोलिसांनी दोघांनी स्वतंत्र उलटतपासणी घेतली. शेवटी सरन्या हिने तिचा गुन्हा कबूल केला. तपास अधिकारी यांनी सांगितले की, सरन्याच्या घराजवळच समुद्र आहे. पती आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी सरन्याने बाळाला घराबाहेर नेले आणि समुद्रकिनारी नेऊन त्याला मारण्याच्या हेतून पाण्यात फेकून दिले. यानंतर ते दीड वर्षांचं मुलं जोरजोरात रडू लागलं. सरन्या पुन्हा मागे फिरली. ती त्या जागेवर गेली. रडणाऱ्या बाळाला हातात घेतलं आणि बाळाचा डोकं खडकावर त्याचं आपटलं. एकदा आपटूनही तो जिवंत असल्याचे लक्षात आल्यावर तिने पुन्हा त्याचं डोकं खडकावर आपटलं. त्यानंतर मात्र त्याचं रडणं थांबलं होतं. त्यानंतर तिने मुलाला समुद्रात फेकून दिलं. बाळाच्या शवविच्छेदन अहवालानुसार डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे बाळाचा मृत्यू झाला आहे. या घटनेसाठी सरन्याने तिच्या पतीला जबाबदार धरले आहे. सरन्या आणि तिच्या पतीमधील नात्यांमध्ये दुरावा आला होता. ते घटस्फोट घेण्याचा विचार करीत होते. काहींनी दिलेल्या माहितीनुसार पतीचा मित्र नितिनसोबत तिचे संबंध होते. तपासादरम्यान तिने सांगितलेली बाब धक्कादायक होती. प्रियकरासोबत राहण्यासाठी तिथे बाळाला मारुन टाकल्याचे सांगितले. जेव्हा ती बाळाला समुद्रावर घेऊन गेली तेव्हा तिने त्याचं डोकं खडकावर आपटंल. दोनदा तिने बाळाचं डोकं खडकावर आपटलं. जेव्हा मुल जिवंत नसल्याचं कळल्यावर तिने त्याला समुद्रात टाकून दिलं आणि घरी आली. घरी आल्यानंतरही तिच्या वागणुकीत काही परिणाम दिसून येत नव्हता. तपासादरम्यान तिच्या कपड्यांवरील वाळू आणि बाळाच्या केसांमुळे हा गुन्हा अधिक स्पष्ट झाला. हेही वाचा राम मंदिराच्या जागेवर होते कब्रिस्तान? पुजाऱ्यांनी सांगितला हा पर्याय मेन्यूमधून हटवले बीफ, कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेरच वाटली बीफ करी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.