राम मंदिराच्या जागेवर होते कब्रिस्तान? पुजाऱ्यांनी सांगितला हा पर्याय

राम मंदिराच्या जागेवर होते कब्रिस्तान? पुजाऱ्यांनी सांगितला हा पर्याय

मंदिराच्या संघर्षात हजारो संतानीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशावेळी त्याला 'संत शहिदा' का म्हटले जाऊ नये

  • Share this:

अयोध्या, 19 फेब्रुवारी : राम मंदिर (Ram Mandir) उभारणी आता शेवटच्या टप्प्यावर आहे. तेथे अयोध्यातील (Ayodhya) 9 मुस्लिमांनी राम जन्मभूमी परिसराबाबत नवा वाद सुरु केला आहे. या मुस्लिमांनी राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले आहे. 67 एकर जमिनीत 5 एकरची जमीन ही कब्रिस्तान असल्याचे या पत्रात नमूद केले आहे. या 9 जणांनी केलेल्या दाव्याबाबत बाबरीचे माजी पक्षकार इकबाल अन्सारी यांनी जातीय सौहार्द जपण्याचा सल्ला दिला आहे. इकबाल अन्सारी यावेळी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सन्मान केला आहे. मात्र आता अशा पद्धतीने पत्र लिहिने जातीयदृष्ट्या नवा वाद निर्माण करण्यासारखे आहे. या प्रकरणात राम मंदिराचे पुजारी आचार्य संतेंद्र दास म्हणतात, 67 एकर जमिनीत कुठेही कब्रिस्तान नाही. तेथे ऋषीमुनींची समाधी नक्की होती. कब्रच्या नावावर अडवणूक केली जात आहे. जेथे शंखाचा आवाज घुमतो आणि पूजा केली जाते तेथील स्मशानभूमी आणि कब्रिस्तानदेखील शुद्ध होतो.

विश्व हिंदू परिषद म्हणाले ते नाराज...

विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्त शरद शर्मा म्हणतात,  जे मंदिर उभारणीसाठी अडथळा निर्माण करीत होते. ते सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर नाराज झाले आहेत. मंदिराच्या संघर्षात हजारो संतानी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशावेळी कब्र असल्याची तथ्यहिन गोष्टी चर्चिल्या जात आहे. त्याला संताचा शहीदाही म्हटले जाऊ शकते.

मुस्लिमांच्या कब्रवर भव्य राम मंदिर उभारू शकत नाही

9 मुस्लीम नागरिकांनी वकिलांच्या माध्यमातून ट्रस्टला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र सरकारकडून 1993 मध्ये अयोध्येत अधिग्रहित करण्यात आलेली 67 एकर जमीन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकारने राम मंदिर उभारणीसाठी दिली. या जमिनीवर मुस्लिमांची कब्र होती. केंद्राने यावर विचारच केला नाही की, मुस्लिमांच्या कब्रवर भव्य राम मंदिर उभारू शकत नाही. हे धर्माच्याविरुद्ध आहे.

पत्रात म्हटले आहे की आपण सामजाताली जागरुक नागरिक आहात. आपणास सनातन धर्माबाबत माहिती आहे. तुम्हाला या गोष्टीवर नक्कीच विचार करायला हवा की राम मंदिराचा पाया हा मुस्लिमांच्या कब्रवर ठेवण्यात यावा का?

याचा निर्णय ट्रस्टच्या मॅनेजमेंटला करावा लागेल. रिपोर्टनुसार चिठ्ठीमध्ये ऐतिहासिक गोष्टींचा हवाला दिला आहे. 1855 मधील दंगलीत 75 मुस्लिमांचा मृत्यू झाला होता. या सर्वांना अयोध्येच्या जमिनीत दफन केलं होतं.

First published: February 19, 2020, 2:35 PM IST

ताज्या बातम्या