नवी दिल्ली, 11 एप्रिल : भारतात कोरोगनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. आतापर्यंत 7 हजार 400 लोकांना लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. त्यापैकी 6 हजार 600 हून अधिक केसेस अॅक्टिव असल्याचं माहिती मिळत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. भारतात संसर्ग झालेल्यांची संख्या गेल्या 15 दिवसांत दहा टक्यांपेक्षा अधिकने वाढली आहे. देशात संक्रमित लोकांची संख्या दररोज 15 टक्क्यांहून अधिक वाढत आहे. आतापर्यंत 7 हजार 618 लोकांना या धोकादायक आजाराने ग्रासले आहे. भारतात 26 मार्च रोजी संसर्ग झालेल्यांची संख्या 730 एवढी होती. परंतु 10 एप्रिलपर्यंत म्हणजे 15 दिवसांत कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 7 हजार 618 वर पोहोचली आहे. 10 एप्रिल रोजी 871 रुग्ण या गंभीर आजाराने बळी पडले. आकडेवारीनुसार, दररोज 10 ते 15 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. 10 एप्रिल रोजी रुग्णांच्या संख्येत 12 टक्यापेक्षा जास्त वाढ झाली. हे वाचा- पंतप्रधान मोदी लॉकडाऊन वाढवणार; उद्या कळेल पुढचं पाऊल भारतात आतापर्यंत 7 हजार 618 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 6 हजार 595 लोक जीवन आणि मृत्यू यांच्यात झुंज देत आहेत. 774 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत 249 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पहिल्यांदाच भारतात कोरोनामुळे 40 रुणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 35 नवीन प्रकरणे नोंदवली गेली. तर 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात सात हजारापेक्षा अधिक प्रकरणे समोर आली आहेत. हे वाचा- उद्धव ठाकरे लॉकडाऊनबद्दल घोषणा करणार? आज 5 वाजता साधणार संवाद संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.