भारतात कोरोनाव्हायरसचा कहर; मात्र मृत्यूच्या आकडेवारीत आश्चर्यकारक घट

भारतात कोरोनाव्हायरसचा कहर; मात्र मृत्यूच्या आकडेवारीत आश्चर्यकारक घट

कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीत जगभरात सर्वसामान्य मृत्यूदरात वाढ झाली आहे, मात्र भारतातील काही भागात परिस्थिती उलट आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : जगभरात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) मृत्यूचा आकडा वाढतो आहे. मात्र भारतात उलट परिस्थिती आहेत. भारतात सामान्य दिवसांच्या तुलनेत लॉकडाऊनच्या (lockdown) दिवसात मृत्यूच्या (death) आकडेवारीत लक्षणीय घट झाली आहे. भारतातल्या काही ठिकाणी मृत्यूदर (mortality rate) कमी झाला आहे. रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार, मध्य मुंबईत मार्च 2019 च्या तुलनेत  मार्च 2020 मध्ये मृत्यूची संख्या 21 टक्क्यांनी कमी झाली आहे.

याच कालावधीत गुजरातमधील सर्वात मोठं शहर अहमदाबादमध्येही मृत्यूदर 67 टक्क्यांपर्यंत घटला. राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कमीत कमी 2 शहरांचा अहवालही असाच आहे.

कोलकाता आणि बंगळुरूत कार्यरत असलेल्या अन्थेष्ठी फ्युनरल सर्व्हिसच्या सीईओ श्रुथी रेड्डा म्हणाले, हे आमच्यासाठी खरंच आश्चर्यकारक आहे. कंपनीने जानेवारीमध्ये दिवसभरात 5 प्रकरणं होती मात्र या महिन्यात फक्त 3  आहेत.

अंत्यसंस्कार आणि स्मशानभूमीशी संबंधित असलेल्या व्यावसायिकांनीही एप्रिलमध्ये व्यवसायात घट झाल्याचं नोंदवलं आहे.

हे वाचा - कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून Virusचा धोका; पतीच्या मृतदेह दफनावरून वाद कोर्टात

भारताच्या पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे प्रोफेसर ऑफ एपिडेमिओलॉजी गिरीधर बाबू म्हणाले, "जर मृत्यूमध्ये वाढ आपल्याला दिसत नाही, तर कोरोनाव्हायरसमुळे जास्त मृत्यू झाल्याची शंका घेतली जाते आहे, त्यात काही तथ्य नाही"

जगापेक्षा उलटी परिस्थिती

भारतातील ही आकडेवारी पाहता जगात याच्या उलट परिस्थिती आहे. उदा. नेदरलँडमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सामान्य मृत्यूपेक्षा 2000 अधिक मृत्यू झाले.इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये मार्चमझ्ये हा आकडा वाढला. इटलीतही काही शहरांमध्ये मृत्यूचा आकडा वाढल्याचं दिसलं.

भारतात मृत्यूचा आकडा कमी का?

आसामचे आरोग्यमंत्री हिमंता बिस्व शर्मा म्हणाले, रस्ते अपघाताचं प्रमाण कमी झालं आहे. शिवाय दारू-ड्रग्जचं व्यसन, स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यांचं प्रमाण कमी झालं आहे.

अधिकृत अहवालानुसार भारतात 2018 साली रस्ते अपघातामुळे 151,400 लोकांचा मृत्यू झाला होता.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संचालक परेश कुमार गोयल म्हणाले, 2018 च्या तुलने यावर्षी मे महिन्याच्या अखेर रस्ते अपघात कमीत कमी 15 टक्क्यांनी घटलं आहे.

हे वाचा - COVID-19 च्या सर्व चाचण्या व उपचार निशुल्क, सरकारनं घेतला मोठा निर्णय

प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे, त्यामुळे रेल्वे अपघातही कमी झालेत. एकट्या मुंबईत दररोज किती तरी रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू होत असतो.

उत्तर प्रदेशच्या गंगा किनाऱ्यावरील स्मशानभूमीचे प्रभारी नीरज कुमार यांनी सांगितलं, दररोज आमच्याकडे कमीत कमी 10 अपघाताची प्रकरणं आणि बहुतेक हत्येची प्रकरणं यायची. मात्र आता हत्येची प्रकरणं येत नाही, फक्त नैसर्गिक मृत्यूची प्रकरणं येत आहेत.

लॉकडाऊननंतर मृत्यूचा आकडा वाढेल?

अहमदाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी डॉ. भाविन जोशी यांनी सांगितलं, "लॉकडाऊननंतर मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता आहे" राष्ट्रीय स्तरावरील आकडेवारी मिळालेली नाही. नवी दिल्ली नगर परिषदेने आकडेवारी देणं शक्य नसल्याचं सांगितलं. पश्चिम बंगालमधूनही डाटा मिळालं नसल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 25, 2020, 10:25 PM IST

ताज्या बातम्या