कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून व्हायरसचा धोका; पतीच्या मृतदेहाच्या दफनावरून वाद कोर्टात जाणार

कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहापासून व्हायरसचा धोका; पतीच्या मृतदेहाच्या दफनावरून वाद कोर्टात जाणार

कोरोनाव्हायरस पसरेल या भीतीने कोरोनाग्रस्त मृतांच्या (coronavirus patient deadbody) अंत्यविधीलाही लोकं विरोध करत आहेत.

  • Share this:

पूर्णिमा मुराली, चेन्नई, 25 एप्रिल : कोरोनाव्हायरस पसरेल या भीतीने कोरोनाग्रस्त मृतांच्या (coronavirus patient deadbody) अंत्यविधीलाही लोकं विरोध करत आहेत. अशा अनेक घटना घडत आहेत. अशीच घटना चेन्नईत घडली आणि चेन्नईतील (chennai) कोरोनाग्रस्त मृत डॉक्टरची पत्नी याला कोर्टात आव्हान देणार आहे. आपल्या पतीचा धार्मिक विधीनुसार नीटपणे पुन्हा दफनविधी (burial) व्हावा, यासाठी त्या कोर्टात धाव घेणार आहेत.

चेन्नईतील न्यूरोसर्जन डॉ. सिमोन हरक्युल्स (Dr Simon Hercules) कोरोनाग्रस्तांवर उपचार करताना त्यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली. त्यानंतर रुग्णवाहिकेने त्यांचा मृतदेह दफनविधीसाठी नेला जात होतो. त्यावेळी स्थानिकांनी रुग्णवाहिकेवर हल्ला केला. यानंतर घाईघाईत त्यांचा मृतदेह दुसऱ्या ठिकाणी दफन करण्यात आला. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचा दफनविधी व्हावा, यासाठी त्यांची पत्नी आनंदी सिमोन (Anandi Simon) झटत आहेत.

हे वाचा - चिंताजनक! आता कोरोना योद्धांचा बळी, मुंबईत पोलिस तर मालेगावात डॉक्टराचा मृत्यू

घडलेल्या घटनेनंतर आनंदी सिमोन यांनी आपल्या पतीचा पुन्हा दफनविधी व्हावा, अशी याचना मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्याकडे केली होती.  तर चेन्नई महापालिकेच्या आयुक्तांनी पुन्हा दफनविधी करणं सुरक्षित नसल्याचं म्हटलं होतं. मात्र आनंदी यांनी आपला लढा सुरूच ठेवणार असल्याचं म्हटलं आहे.

न्यूज 18 शी बोलताना आनंदी म्हणाल्या, "जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मृत व्यक्तीच्या शरीरात व्हायरस फक्त 3 तास राहतो. त्यामुळे माझ्या पतीचा मृतदेह वेलांगाडू इथल्या दफनभूमीतून काढून पुन्हा किलपौकमध्ये दफन करता येऊ शकतो. यामुळे कोरोनाव्हायरस पसरणार नाही"

"माझ्या पतीने राज्यासाठी योग्य ते सर्व केलं आणि धार्मिक विधीनुसार त्यांचा दफनविधी व्हावा अशी त्यांची इच्छा होती,  त्यामुळे त्यांची ही शेवटची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. आता माझ्याकडे कोर्टात जाण्याचाच एक मार्ग उरला आहे, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे आणि मी माझ्या पतीची शेवटची इच्छा पूर्ण करणार अशी मला आशा आहे", असंही त्या म्हणाल्या.

हे वाचा - दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

न्यूज 18 लोकमतशी बोलताना Indian Medical Assiciationचे राज्यातले (IMA, Maharashtra) अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितलं, "कोरोना विषाणूच्या संसर्गाने आजार होऊन मृत्यू पावणाऱ्याची संख्या वाढत चालली आहे. मृतदेहामध्ये कोरोनाव्हायरस किती काळ राहतो याबद्दल अजून संशोधकांना अद्याप खात्रीलायक माहिती मिळालेली नाही.

आजमितीला रुग्ण मृत्यू पावल्यावर त्यापासून विषाणूंचा संसर्ग इतरांना होतो किंवा नाही, याबद्दल खात्रीपूर्वक माहिती नाही. त्यामुळे मृतदेहाचा अंत्यविधी करताना घ्यायची काळजी महत्वाची ठरते. यासाठी काही संकेत जागतिक आरोग्य संघटना आणि भारत सरकारने प्रसिद्ध केले आहेत, असं डॉ. भोंडवे यांनी सांगितलं.

संपादन - प्रिया लाड

First published: April 25, 2020, 8:32 PM IST

ताज्या बातम्या