मराठी बातम्या /बातम्या /देश /

प्रियंका गांधींची हटके स्टाईल, महिला पोलिसाला मिठी मारत दिलं सरप्राईज, वाचा सविस्तर

प्रियंका गांधींची हटके स्टाईल, महिला पोलिसाला मिठी मारत दिलं सरप्राईज, वाचा सविस्तर

काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधींनी महिला पोलीस (Priyanka Gandhi hugs lady police in Varanasi) अधिकाऱ्याला मारलेली मिठी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

  • Published by:  desk news

वाराणसी, 10 ऑक्टोबर : काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधींनी महिला पोलीस (Priyanka Gandhi hugs lady police in Varanasi) कॉन्स्टेबलला मारलेली मिठी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या (Priyanka Gandhi on Varanasi tour) वाराणसी दौऱ्यावर आहेत. विमानतळावर स्वागत झाल्यानंतर त्यांनी थेट काशी विश्वेश्वराचं मंदिर गाठलं आणि मंदिरात दर्शन घेतलं. पूजा झाल्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा निर्णय घेतला. कडक सुरक्षा व्यवस्थेत परिक्रमा करणाऱ्या प्रियंका गांधींना एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने हात दाखवून इशारा केला.

प्रियंका गांधींनी दिला प्रतिसाद

वाराणसीत काशी विश्वेवर मंदिराची परिक्रमा करत असताना एका महिला पोलीस कॉन्स्टेबलने हात उंचावून अभिवादन केल्यानंतर प्रियंका गांधी तिच्या दिशेनं गेल्या. हात पुढे करून तिला जवळ बोलावलं आणि तिला मिठी मारत आश्चर्याला धक्का दिला. यामुळे ती महिला अधिकारीदेखील गहिवरली आणि आपल्या सादाला मिळालेला प्रतिसाद पाहून आनंदित झाली. प्रियंका गांधींच्या या मिठीची जोरदार चर्चा सोशल मीडियात रंगली होती.

प्रियंका गांधींचा जनसंपर्क

अचानकपणे वाटेत येणाऱ्या नागरिकांना भेटणं, त्यांना अभिवादन करणं, मिठीत घेणं यासारख्या प्रकारांमुळे प्रियंका गांधींची सध्या जोरदार चर्चा होत आहे. एअरपोर्टवरून मंदिराकडे येत असताना वाटेतदेखील त्यांनी एका ठिकाणी आपली गाडी थांबवत पक्षाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर दुर्गामातेची पूजा करत त्यांनी मूर्तीला हळदकुंकू वाहिलं होतं. अन्नपूर्णा मंदिरात महंत शंकरपुरी यांनी प्रियंका गांधींना प्रसाद दिला.

हे वाचा - बापरे! 85 कैदी HIV POSITIVE, तुरुंगात होतोय वेगाने प्रसार; कारण ऐकून बसेल ध

निवडणुकांचा वातावरण

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीचा माहौल चांगलाच गरम झाला आहे. सर्व पक्ष हिरीरीनं कामाला लागले असून आपल्या कार्यकर्त्यांना उत्साहित आणि सक्रीय करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या काही वर्षांपासून पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसनं आता पुन्हा पक्ष उभारणीसाठी कंबर कसली असून प्रियंका गांधींनी प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:

Tags: Priyanka gandhi, Varanasi