नवी दिल्ली, 2 जून : ते 2014 साल होतं. 26 मे रोजी नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यापूर्वीच, त्यांनी सर्व दक्षिण आशियाई देशांच्या सरकारच्या प्रमुखांना त्यांच्या शपथविधी समारंभासाठी आमंत्रित करून परराष्ट्र संबंधांच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. शपथविधीपासून ते नुकत्याच झालेल्या टोकियो भेटीपर्यंत, जगभरातील देशांशी असलेल्या संबंधांचं नूतनीकरण करणं आणि नव्यानं वेगळ्या पातळीवर हे संबंध घेऊन जाणं हे पंतप्रधान मोदींचं लक्ष्य आहे. जोरदार भाषणांपासून ते अनेक भेटी आणि अगदी मिठीपर्यंतच्या प्रयत्नांना फळ मिळू लागलं आहे. जागतिक नेते आता भारताचे प्रयत्न आणि क्षमता मान्य करत आहेत. आठ वर्षानंतर, पंतप्रधान मोदींच्या विदेशी मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांमधील ठळक मुद्दे आणि प्रथमच केलेल्या गोष्टींवर एक नजर: 2014 चा शपथविधी (Narendra Modi’s Swearing-in Ceremony) 2014 पर्यंत, नवी दिल्लीत कार्यरत परदेशी राजदूत या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. परंतु, जागतिक नेत्यांना कधीही आमंत्रित केलं गेलं नाही. सर्वप्रथम, राष्ट्रपती भवनात पंतप्रधान मोदींच्या शपथविधीसाठी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांना आमंत्रित करण्यात आलं होतं.
Pak PM Nawaz Sharif waves to journalists upon arriving in Delhi to attend Modi's swearing-in ceremony. #PMModi pic.twitter.com/rmfP1Lsrul
— News18 (@CNNnews18) May 26, 2014
याशिवाय, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 2015 मंगोलिया भेट (2015 MONGOLIA VISIT) 2015 पर्यंत कोणत्याही भारतीय पंतप्रधानांनी रशिया आणि चीनच्या दरम्यान असलेल्या मंगोलियाला भेट दिली नव्हती. “आमचं नातं असं आहे की, जे व्यापाराच्या प्रमाणात मोजलं जात नाही किंवा इतरांशी स्पर्धा केली जात नाही. हे अतुलनीय सकारात्मक उर्जेचं नातं आहे, जे आपल्या आध्यात्मिक दुव्यांमधून आणि सामायिक आदर्शांमधून येतं,” असं पंतप्रधान म्हणाले.
With Kanthaka, a gift from Mongolia. pic.twitter.com/oN1ascckyX
— Narendra Modi (@narendramodi) May 17, 2015
त्यांनी मंगोलियन संसदेला संबोधित केलं आणि देशासोबत धोरणात्मक भागीदारी सुरू केली. 2015 UAE भेट (2015 UAE VISIT) ऑगस्ट 2015 मध्ये मोदींनी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा केला होता. तीन दशकांहून अधिक काळातील भारतीय पंतप्रधानांनी आखाती अरब देशाला केलेला हा पहिला दौरा होता आणि मोदींचा इस्लामिक देशाचा पहिला दौरा होता. इंदिरा गांधी यांनी शेवटचा या देशाचा दौरा 1981 मध्ये केला होता.
Hello UAE. I am very optimistic about this visit. I am confident the outcomes of the visit will boost India-UAE ties pic.twitter.com/50b4atyIZP
— Narendra Modi (@narendramodi) August 16, 2015
पीएम मोदींनी दुबई क्रिकेट स्टेडियमवर हजारो लोकांना संबोधित केलं. त्यांनी व्यापार, गुंतवणूक आणि सुरक्षा या विषयांवर नेत्यांशी चर्चा केली. 2015: ब्रिटीश संसदेला संबोधन (2015: BRITISH PARLIAMENT) 2015 मध्ये, ब्रिटीश संसदेत बोलणारे मोदी हे पहिले भारतीय नेते होते.
My speech at the British Parliament focussed on the strong future of India-UK ties & its many benefits. https://t.co/wCMnycqb7y
— Narendra Modi (@narendramodi) November 12, 2015
ब्रिटीश खासदारांसमोर केलेल्या भाषणात मोदी म्हणाले, “अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर आता सांगणं कठीण आहे की त्या ब्रिटिश आहेत की भारतीय: जग्वार की स्कॉटलंड यार्ड, उदाहरणार्थ…. आणि, लॉर्ड्सची खेळपट्टी अयोग्य रीतीने स्विंग होते की ईडन गार्डन्सची विकेट खूप लवकर तुटते हे आमचे जोरदार वादविवाद आहेत. आणि, आम्हाला लंडनचा भांगडा रॅप आवडतो जशी तुम्हाला भारतातील इंग्रजी कादंबरी आवडते.” 2017 इस्रायल भेट (2017 ISRAEL VISIT) 4 जुलै 2017 रोजी नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. तेल अवीव येथे त्यांचे इस्रायली समकक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यांचं स्वागत केलं.
Hello Israel! Today I begin a special & historic visit with the aim of further strengthening the relations between India and Israel. pic.twitter.com/q8mfeaciIu
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2017
दहशतवादविरोधी आणि शस्त्रास्त्र खरेदीवर एकत्र काम करणाऱ्या दोन राष्ट्रांमधील संबंधांमध्ये ही भेट महत्त्वाची होती, परंतु त्यांच्यात जवळचे संबंध नव्हते. एका वर्षानंतर मोदींनी नेतान्याहू भारतात आल्यानंतर त्यांचं यजमानपद भूषवलं. 2018 रमाल्लाह भेट (2018 RAMALLAH VISIT) फेब्रुवारी 2018 मध्ये, पॅलेस्टाईनला अधिकृत भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान बनले. ते पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या रामाल्लाह येथील अध्यक्षीय मुख्यालयात दाखल झाले. पॅलेस्टिनी नेत्यांनी या भेटीला “ऐतिहासिक” असं संबोधलं, तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या भेटीला “खरेच संस्मरणीय आणि इतिहास घडवणारी” म्हटलं. Friendship between India and Palestine has stood the test of time. The people of Palestine have shown remarkable courage in the face of several challenges. India will always support Palestine’s development journey.
Friendship between India and Palestine has stood the test of time. The people of Palestine have shown remarkable courage in the face of several challenges. India will always support Palestine’s development journey.
— Narendra Modi (@narendramodi) February 10, 2018
पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या उपस्थितीत पंतप्रधानांनी भाषण केलं. 2018 रवांडा दौरा (2018 RWANDA TOUR) जुलै 2018 मध्ये, मोदींनी आफ्रिकेतील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असलेल्या रवांडाचा दोन दिवसांचा दौरा केला. त्यांनी अध्यक्ष पॉल कागामे, व्यापारी नेते आणि भारतीय समुदायांच्या बैठका घेतल्या.
Wonderful interaction with the Indian diaspora in Rwanda.
— Narendra Modi (@narendramodi) July 23, 2018
In every part of the part of the world, the Indian diaspora is distinguishing itself and making us proud of their accomplishments.
Rwanda’s Indian community is a very positive influence on the India-Rwanda friendship. pic.twitter.com/6b2wd1eEQ0
भारताने संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आणि रवांडामध्ये मिशन सुरू करण्याची घोषणा केली. 2021 UNSC बैठक (2021 UNSC MEET) संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (UNSC) नवी दिल्ली इथं बैठका सुरू असताना 9 ऑगस्ट 2021 रोजी मोदींनी एका बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवलं. त्यांनी ‘सागरी सुरक्षा वाढवणं - आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी महत्त्वाचा भाग’ या चर्चेचे अध्यक्षपद भूषवलं.
The presidency of #UNSC is a proud moment for the nation!
— MyGovIndia (@mygovindia) August 4, 2021
Hon'ble PM Shri @narendramodi will be India's first Prime Minister to preside over the meeting of the United Nations Security Council. Watch to know more! @PMOIndia @PIB_India @MIB_India pic.twitter.com/LX5lMtZzWM
पंतप्रधानांनी चर्चेसाठी पाच-तत्त्वांचा आराखडा तयार केला. यापैकी पहिलं म्हणजे सागरी व्यापारातील अडथळे दूर करणं. या संदर्भात, मोदींनी SAGAR (Security and Growth for all in the Region - क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि वाढ) हे प्रादेशिक सागरी सुरक्षेसाठी 2015 चं भारताचं तत्त्व अधोरोखित केलं. 2022 डेन्मार्क भेट (2022 DENMARK VISIT) युक्रेनचं संकट सुरू असतानाच, पंतप्रधान मोदींनी डेन्मार्कला भेट दिली. गेल्या दोन दशकांतील भारतीय पंतप्रधानांपैकी डेन्मार्कला जाणारे मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 2002 च्या कोपनहेगन दौऱ्यानंतर भारत आणि डेन्मार्क यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले होते. डेन्मार्कचे तत्कालीन पंतप्रधान अँडर फॉग रासमुसेन यांनी भारताला पाकिस्तान आणि काश्मीर समस्येशी कसं सामोरं जावं, याबद्दल सल्ला दिला होता, तेव्हा भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली होती.
Landed in Copenhagen. I am very grateful to PM Frederiksen for the warm welcome. This visit will go a long way in further cementing India-Denmark ties. @Statsmin pic.twitter.com/0NOQG6X30I
— Narendra Modi (@narendramodi) May 3, 2022
2009 मध्ये मनमोहन सिंग संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीसाठी कोपनहेगनला गेले होते तेव्हा त्यांनी कोणतीही द्विपक्षीय चर्चा केली नाही. मोदींच्या दौऱ्याचं उद्दिष्ट संबंध सुरळीत करणं हे होतं.